वाहन चालकांनो, महामार्गावरील पिवळ्या, पांढऱ्या रेषांचा अर्थ आपणास माहीत आहे ना?

Drivers know the meaning of the yellow, white lines on the highway
Drivers know the meaning of the yellow, white lines on the highway

नागपूर : आपण महामार्गावरून वा राज्यमार्गावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी पिवळ्या आणि पांढर्‍या रेषा आपल्या नजरेस पडतात. आपल्या मनात त्याबाबत अनेकदा प्रश्‍नही निर्माण झाला असेल की, रस्त्यावरील रेषांचा अर्थ काय? कशासाठी त्या काढलेल्या असेल? मित्रांनो, रस्त्यावरील या रेषांचे आपल्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी अतिशय महत्त्व आहे.

रस्त्यावरून वाहन चालविऱ्या प्रत्येकाला या रेषांविषयी माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. आपल्याला रस्त्यावरील या रेषांचा अर्थ माहीत नसेल तर तुम्ही कधीही अपघाताला सामोरे जाऊन तुमचे व इतरांचेही जीवन धोक्यात येऊ शकते. तर मग जाणून घेऊ या रस्त्यावर काढलेल्या या पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांविषयी.

महामार्गांवर तीन प्रकारच्या रेषा काढलेल्या असतात. एकेरी तुटक पांढरी रेषा, दुहेरी पिवळी रेषा आणि पूर्ण पांढरी रेषा. या तिन्ही रेषांचा खास अर्थ आहे. प्रत्येकाला या रेषांचा अर्थ आणि नियम माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला रस्त्यावर बनलेल्या या सर्व रेषांबद्दल माहिती असेल तर आपण कोणत्याही रस्ता अपघातापासून स्वतःचे रक्षण करू शकता.

एकेरी तुटक पांढरी रेषा (ब्रोकन व्हाईट लाइन) : सगळ्यात पहिल्यांदा एकेरी तुटक पांढरी रेषा या विषयी जाणून घेऊ या. रस्त्याच्या मध्यभागी काही मीटर अंतरावर आपणास एकेरी तुटक पांढरी रेषा दिसली असेल. याला इंग्रजीत ब्रोकन व्हाईट लाइन असे म्हणतात. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही पांढरी तुटलेली रेषा तुम्हाला सांगते की, तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असताना यू टर्न घेऊ शकता किंवा लेन बदलू शकता. परंतु या वेळी आपणास सांभाळून गाडी चालवणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

पूर्ण पांढरी रेषा (व्हाईट सॉलिड लाइन) : रस्त्यावरील पूर्ण पांढऱ्या रेषेला इंग्रजीत ‘व्हाईट सॉलिड लाइन’ असे म्हणतात. ती रस्त्याच्या मध्यभागी असते. ही पांढरी ठोस रेषा सूचित करते की, रस्त्यावर कोणत्याही दिशेने चालवत असताना आपण यू टर्न घेऊ शकत नाही आणि ओव्हरटेक देखील करू शकत नाही.

दुहेरी पिवळी रेषा : बहुतेक वेळा आपल्याला रस्त्याच्या मध्यभागी दोन पिवळ्या रेषा दिसल्या असतील. या पिवळ्या डबल लाइनचा अर्थ असा की, आपण दुसऱ्या दिशेने यू टर्न घेऊ शकत नाही. ज्या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने धावत असतात अशा मार्गावर ही रेषा बहुधा बनविली जाते.

रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या प्रत्येकाला या रेषांचा अर्थ माहीत झाल्यात तो कधीही रस्ता अपघाताला बळी पडू शकत नाही. कारण या रेषाच त्याला रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना दिशानिर्देशांचे काम करीत असतात.

संपादन आणि संकलन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com