esakal | "सीटीईटी'साठी नोंदणी : जाणून घ्या कोण करू शकतात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

CTET

"सीटीईटी'साठी नोंदणी : जाणून घ्या कोण करू शकतात अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सीटीईटीच्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी लवकरच एक चांगली बातमी येऊ शकेल.

सोलापूर : सीटीईटीच्या (CTET) (Central Teaching Eligibility Test) नोटिफिकेशनची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी लवकरच एक चांगली बातमी येऊ शकेल. सीटीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या महिन्यापासून सुरू होऊ शकते. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. सीटीईटी 2021 अर्ज प्रारंभ तारीख अधिकृतपणे मंडळाने जाहीर केलेली नाही. म्हणून उमेदवारांनी सीटीईटी ऍप्लिकेशन 2021 सुरू होण्याबाबत अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी सीटीईटी पोर्टल ctet.nic.in तपासावे. (Education-Jobs: Find out who can register for the CTET exam-ssd73)

हेही वाचा: 'या' ई-मेल शिष्टाचाराचे करा पालन! व्यक्तिमत्त्वाचा वाढेल प्रभाव

ज्या उमेदवारांना सीटीईटी परीक्षेत भाग घ्यायचा असेल त्यांनी वरिष्ठ माध्यमिक किंवा पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी किमान दोन वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम (बीएड, डीएएलड, बीटीसी आदी) पूर्ण केलेला असावा. टीचिंग पेपरनुसार सीटीईटी परीक्षेत अध्यापनाचे वेगवेगळे स्तर आहेत आणि उमेदवारांना केवळ त्यांच्या इच्छित वर्गासाठी अध्यापनाच्या विहित पेपरमध्ये हजर राहावे लागेल. सीटीईटी परीक्षा पोर्टल ctet.nic.in वर जाहीर होणाऱ्या सीटीईटी 2021 च्या अधिसूचनेमधून पेपर्सची व विहित शैक्षणिक पात्रतेबद्दलची संपूर्ण माहिती उमेदवारांना मिळू शकेल.

नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन (एनसीटीई) (National Council of Teacher Education) ने नुकतीच 21 जून 2021 रोजी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, की सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहील. पूर्वी सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे होती. अशा परिस्थितीत असे मानले जाते, की सीटीईटी 2021 साठी अर्जांची संख्या कमी असेल.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

सीटीईटी पेपर नमुना आणि अभ्यासक्रम (पेपर -1)

 • बाल विकास आणि शिक्षणशास्त्र - 30 प्रश्न

 • भाषा -1 (अनिवार्य) - 30 प्रश्न

 • भाषा -2 (अनिवार्य) - 30 प्रश्न

 • गणित - 30 प्रश्न

 • पर्यावरणीय अभ्यास - 30 प्रश्न

सीटीईटी पेपर नमुना आणि अभ्यासक्रम (पेपर - 2)

 • बाल विकास आणि शिक्षणशास्त्र - 30 प्रश्न

 • भाषा - 1 (अनिवार्य) - 30 प्रश्न

 • भाषा -2 (अनिवार्य) - 30 प्रश्न

 • गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान - 60 प्रश्न

 • एकूण प्रश्न : 150

 • एकूण गुण : 150

loading image