esakal | दहावी निकाल : जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्के ! 350 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
sakal

बोलून बातमी शोधा

Students

सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पुणे विभागाचा निकाल 99.95 टक्‍के लागला आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्‍के लागला असून मुलांनी यंदा बाजी मारली आहे.

सोलापूर : दहावीचा निकाल (Tenth Result) नुकताच जाहीर झाला असून, पुणे विभागाचा निकाल 99.95 टक्‍के लागला आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्‍के लागला असून मुलांनी यंदा बाजी मारली आहे. परीक्षा न झाल्याने मागील गुणांचा आधार घेऊन हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अंदाजित 350 मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून 270 शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. त्यात सोलापूर शहर, माढा व मंगळवेढ्यासह अन्य तालुक्‍यांतील शाळांचाही समावेश आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर बाबर (Education Officer Bhaskar Babar) यांनी दिली. (ssc board result 2021 : 350 students of class Xth in Solapur district got hundred percent marks-ssd73)

हेही वाचा: रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात

कोरोनामुळे (Covid-19) यंदा दहावीची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नववीचे गुण, दहावीतील अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिकावर आधारित हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा निकालाची टक्‍केवारी वाढणार हे निश्‍चितच होते. सोलापूर जिल्ह्यातील 68 हजार 22 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी 68 हजार 18 विद्यार्थ्यांनीच शाळांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे निकालाची टक्‍केवारी थोडीशी कमी झाली आणि यंदा 99.27 टक्‍के निकाल लागला. दहावीच्या निकालाची टक्‍केवारी वाढली, परंतु पुढील प्रवेशासाठी आता त्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. त्याची तारीख अजून जाहीर झाली नसून दोन दिवसांत त्याची घोषणा होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल अमान्य आहे, त्यांच्यासाठीही नवा पर्याय दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना 100 टक्‍के गुण मिळाले आहेत, त्यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरवात केली आहे. तर ज्या शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी

 • तालुका : टक्‍केवारी

 • अक्‍कलकोट : 97.48

 • बार्शी : 98.99

 • करमाळा : 99.76

 • माढा : 99.79

 • माळशिरस : 99.61

 • मंगळवेढा : 99.83

 • मोहोळ : 99.79

 • पंढरपूर : 99.85

 • सांगोला : 99.90

 • सोलापूर शहर : 98.85

निकालासंदर्भातील ठळक बाबी...

 • जिल्ह्यातील 68 हजार 22 पैकी 68 हजार 18 विद्यार्थी उत्तीर्ण

 • 38 हजार 931 मुले तर 29 हजार 87 मुलींचा पुणे बोर्डाकडून निकाल जाहीर

 • सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्‍के; माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा अव्वल

 • जिल्ह्यातील मुलींचा निकाल 99.16 टक्‍के तर मुलांच्या निकालाची टक्‍केवारी 99.36 टक्‍के

 • जिल्ह्यातील 350 पेक्षा अधिक मुलांना शंभर टक्‍के गुण

 • जिल्ह्यातील जवळपास 270 हून अधिक शाळांचा निकाल 100 टक्‍के

loading image