ICSE Board Result 2022 : पुण्यातील हरगुण कौर माथरू देशात पहिली

देशात ९९.८० टक्के गुण मिळवीत चार विद्यार्थिनींनी पटकाविला पहिला क्रमांक
education news ICSE 10th Result 2022 punes hargun kaur mathru is the first in the country
education news ICSE 10th Result 2022 punes hargun kaur mathru is the first in the country sakal

पुणे : द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या(इयत्ता दहावी) परीक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने ९९.८० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यात पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील हरगुण कौर माथरू हिचा समावेश आहे.

सीआयएससीईतर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. देशातील दोन हजार ५३५ शाळांमधील दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात एक लाख २५ हजार ६७८ विद्यार्थी, तर एक लाख पाच हजार ३८५ विद्यार्थिनी होत्या. या निकालातही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थिंनीपैकी ९९.९८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९७ टक्के इतकी आहे.

आयसीएसईची लेखी परीक्षा ६१ विषयांमध्ये आणि देशातील २० भाषा, ९ परदेशी भाषा आणि एक क्लासिकल भाषेत झाली. देशात दक्षिण आणि पश्चिम विभागातील ९९.९९ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

‘आयसीएसई’ दहावीच्या परीक्षेचा निकाल

तपशील : विद्यार्थी : विद्यार्थिनी

उत्तीर्ण विद्यार्थी : १,२५,६३५ (९९.९७ टक्के) : १,०५,३६९ (९९.९८ टक्के)

अनुत्तीर्ण विद्यार्थी : ४३ (०.०३ टक्के) : १६ (०.०२ टक्के)

विभागनिहाय निकाल

तपशील : उत्तर : पूर्व : पश्चिम : दक्षिण : परदेशी

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : ७९,९१८ : ७३,३७० : ३१,०२६ : ४६,०९२ : ५९८

एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी : ७९,९३७ : ७३,४०१ : ३१,०२८ : ४६,०९६ : ६०१

‘‘पहिल्या सत्रातील परीक्षेतील गुण पाहून आपल्याला चांगले गुण मिळतील असे वाटत होते. परंतु संपूर्ण देशात आपण पहिले येऊ असे कधीच वाटले नाही. पण देशात पहिला क्रमांक आल्याचा खूप जास्त आनंद वाटत आहे. कोरोना काळातही शाळेने ऑनलाइनद्वारे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आता विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. त्यातही अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र शाखेत पुढील शिक्षण घेण्याचा विचार आहे.’’

- हरगुण कौर मथारू, सेंट मेरी स्कूल (९९.८० टक्के) आणि देशात पहिली आलेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com