esakal | राज्यात आज अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा | Education update
sakal

बोलून बातमी शोधा

 online exams

राज्यात आज अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई : राज्यात आणि राज्याबाहेरील अॅक्युपंक्चर (Acupuncture Exam) चिकित्सा पद्धतीच्या क्षेत्रात करिअर आणि व्यवसायासाठी (career) राज्य अॅक्युपंक्चर परिषदेमार्फत रविवारी १० ऑक्टोबरला सकाळी ११ ते २ या वेळेत पात्रता परीक्षेचे (Eligibility test) आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाईन (online) असून त्यात ७ हजार ७६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ६ हजार ३८४ व्यवसायी या परीक्षेला बसणार असल्याची माहिती परिषदेचे प्रबंधक नारायण नवले (narayan navale) यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज

अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीची ही परीक्षा मागील वर्षी घेण्याचे नियोजन होते, त्यासाठी परिषदेकडून १ जानेवारी २०२० पासून अॅक्युपंक्चर व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पात्र आणि निकष पूर्ण केलेले ६ हजार ३८४ उमेदवार परीक्षेला बसतील. या उमेदवारांना युजर आयडी, पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ई-मेल आणि मेसेजही पाठवण्यात आले असल्याचे नवले म्हणाले. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल, संगणकाद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तर आयफोनचा वापर करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय काही अडचणी आल्यास परिषदेने https://www.mahacucouncil.org या संकेतस्थळावर परीक्षेसाठी माहिती उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे अॅक्युपंक्चर परिषद

राज्य सरकारने अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्घती अधिनियम, २०१५ अन्वये महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली आहे. ही देशातील पहिलीच अॅक्युपंक्चर परिषद ठरली असून या परिषदेतर्फे राज्यातील व राज्याबाहेरील अॅक्युपंक्चर व्यावसायिकांची नोंदणी प्रक्रिया केली जाते. त्यांच्यासाठी पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, विद्यमान कायद्यानुसार परिषदेचे कार्यक्षेत्र राज्यभर निश्चित करण्यात आले आहे.

loading image
go to top