केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबरमध्ये; वेळापत्रक जाहीर

CBSE CTET 2021
CBSE CTET 2021sakal media

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (CBSE) शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबरमध्ये आहे. यासाठी सीबीएसईने वेळापत्रक (CBSE Timetable) जाहीर केले आहे.

16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 या दरम्यान परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील एकूण 20 भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. तर यंदा ही परीक्षा काॅम्पुटर बेस म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

CBSE CTET 2021
कोट्यावधीच्या घोटाळ्यातील हजाराचा दंडही कमी होणार ?

परीक्षार्थ्यांना 20 सप्टेंबरपासून सीटीईटीसाठी आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे.अर्ज भरण्याची मुदत 19 आॅक्टोबर रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत आहे. http://ctet.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात. परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेची माहिती, पात्रता, परीक्षेचे माध्यम, दिनांक, परीक्षा केंद्रांची माहिती टीईटीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com