सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या परीक्षा ऑफलाईनच | education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या परीक्षा ऑफलाईनच

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबत सीबीएसई (CBSE) आयसीएसई (ICSE) या केंद्रीय मंडळांच्या (central board) पहिल्या सत्रातील परीक्षा या ऑफलाईन (offline) पद्धतीने होणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) रिट याचिका (writ petition) दाखल केली हेाती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या परीक्षांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

हेही वाचा: खारघर : वणव्यामुळे वनसंपदा नष्‍ट होण्याची भीती

देशभरात सध्या सीबीएसईच्या पहिल्या सत्रातील बारावीची परीक्षा 16 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तर आयसीएसईची परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच दरम्यान सहा विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस न घेतल्याचे कारण सांगून या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यासा‍ठी पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर अंतिम सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे सांगत याचिका फेटाळली.

दरम्यान, सीबीएसईचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, आम्ही ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे सर्व नियोजन केलेले होते. देशातील एकुण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतरच या परीक्षांचा निर्णय घेण्यात आला होता. मंडळाने आता परीक्षा सुरू आहेत, त्या सर्वच ठिकाण कोरोना प्रतिबंधक सर्व खबरदारी घेतली आहे. मागील परीक्षेत एका वर्गात ४० विद्यार्थ्यांना बसण्याची सोय होती. यंदा मात्र एका वर्गात केवळ १२ विद्यार्थीच परीक्षा देणार आहेत. परीक्षेचा अवधीही कमी करण्यात आला असून परीक्षा केंद्रांची संख्याही दुपट्टीने वाढविण्यात आल्‍याची माहिती मेहता यांनी दिली.

loading image
go to top