Education Update : अकरावी प्रवेशाची पुन्हा एकदा प्राधान्य फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eleventh Admission

Education Update : अकरावी प्रवेशाची पुन्हा एकदा प्राधान्य फेरी

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात (junior college) अकरावीच्या रिक्त राहिलेल्या जागांवरील (eleventh vacant seats) प्रवेशासाठी पुन्हा एकदा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी शिक्षण विभागाने (education authorities) पुन्हा एकदा प्रथम प्राधान्य (first priority) तत्त्वानुसार या दोन फेऱ्यां आयोजित केली आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे (education policy) पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्याप्रमाणात गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून प्रवेश मिळण्याचा (online admission) मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या फेऱ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण : आरोपी मोहन चौहानवर आरोप निश्चिती

एफसीएफएस फेरी ही पहिला टप्पा- 16 ते 22 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्या ऐवजी शालेय शिक्षण विभागाकडून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य फेरीचे आयोजन केले जात आहे.

या प्रवेश फेऱ्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने प्रवेशाला मुहा मिळत असल्याचा आरोप शिक्षण तज्ञांकडून केला जात आहे. मुळात या प्रथम प्राधान्याने प्रवेश फेरीची गरजच नव्हती. परंतु केवळ संस्थाचालकांची हित जपण्यासाठी अकरावीचे प्रवेश करणाऱ्या संस्थेने हा घाट घातला असल्याचा आरोप ही बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

loading image
go to top