रविवारी होणारी TET आणि UGC नेट परीक्षा एकाच दिवशी; वाचा सविस्तर | Education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 TET exam

रविवारी होणारी TET आणि UGC नेट परीक्षा एकाच दिवशी; वाचा सविस्तर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे (corona infection) मागील काही महिन्यांपासून लांबलेली व राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) अखेर, रविवारी (Sunday) २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी परिषदेकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी दिली.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

रविवारी टीईटीसोबतच देशभरात राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) या ही परीक्षाही होत असल्याने त्यामुळे अनेक उमेदवारांची अडचण होईल, शिवाय राज्यात एसटीचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फटका बसेल, यामुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक भारती व शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे. टीईटी आणि नेट या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी 21 नोव्हेंबरला होणार आहेत.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा तर विद्यापीठ, महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा देणे अनिवार्य आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दोन्ही परीक्षा उपयुक्त आहेत. मात्र त्या एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडणार असल्याचा दावा संघटनांकडून करण्ण्यात आला आहे, तर युजीसीच्या नेट परीक्षेचा आणि टीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा तितकासा संबंध येत नाही, त्यामुळे नियोजन टीईटी परीक्षा ही २१ नोव्हेंबर रोजीच होणार असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

परीक्षा केंद्रांची संख्या दुपटीहून अधिक

यंदा टीईटला पेपर- १साठी तब्बल १ लाख १६ हजार ३८१ तर पेपर-२साठी ७६ हजार २०३ उमेवार बसणार आहेत. तर दोन्ही पेपरसाठी मिळून १ लाख ३८ हजार ४७ उमेवार असतील. राज्यात यंदा कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांची संख्या ही दुपटीवर करण्यात आल्याने यंदा ही परीक्षा तब्बल १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. पेपर-१ची परीक्षा ही सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होणार असून पेपर-२ ची परीक्षा ही दुपारी २ ते ४.३० या कालावधीत पार पडणार असल्याची माहितीही जगताप यांनी दिली.

loading image
go to top