esakal | ‘आरटीई’ प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

0No_20date_20of_20admission_20given_20yet_20Confusion_20among_20parents_20about_20RTE_20admission.jpg

‘आरटीई’ प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवर सोडतीद्वारे (lottery) निवड झालेल्या राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६९.१९ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले. ( elementry education deparment Extension till July 31 RTE admission)

‘आरटीई’नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांवर लॉटरीद्वारे ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड केली होती. आतापर्यंत त्यातील ५६ हजार ८२८ (६९.१९ टक्के) विद्याथ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

हेही वाचा: ‘सीईटी’नंतरच प्रवेशप्रक्रिया; शिक्षण विभागाचे आदेश

तर पुणे (pune) जिल्ह्यातील ९८५ शाळांमधील १४ हजार ७७३ जागांवर लॉटरीद्वारे १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्यातील नऊ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार'

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी आता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरिक्त रिक्त जागासाठी प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार प्रवेश देण्यात येणार आहेत, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top