अकरावीच्या प्रवेशातील दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली.
eleventh admission merit list declare
eleventh admission merit list declaresakal
Summary

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली.

पुणे - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. या फेरीत सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (ता.१७) प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत दिली आहे.

या फेरीत चार हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर एक हजार १३५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या, ५०४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या, २९३ विद्यार्थ्यांना चौथ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. या प्रवेश फेरीसाठी ३७ हजार ८६९ जागा उपलब्ध होत्या, त्यासाठी नऊ हजार ४१५ विद्यार्थी पात्र ठरले. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे, ही प्रक्रिया शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांना शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त जागांचा तपशील रविवारी (ता. १८) जाहीर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com