Eleventh Admission : अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मिळणार अंतिम संधी

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील असणार हा शेवटचा टप्पा.
Admission
Admissionesakal

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम संधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सातव्या विशेष फेरी आयोजित केली आहे. या फेरीत प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता.११) ते शुक्रवार (ता.१३) दरम्यान अर्ज करता येणार आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा असणार आहे. आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या, एटीकेटी लागू असणाऱ्या, यापूर्वी प्रतिबंधित केलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना या सातव्या विशेष फेरीत प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरणे, अर्जात बदल करणे, तो प्रमाणित करणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम ठरविणे यासाठी ११ ते १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

या फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची ही अंतिम फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना संबंधित प्रवेश रद्द करता येणार नाहीत. यावर्षी ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य फेरी’ होणार नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com