Eleventh Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
Eleventh Admission Merit List
Eleventh Admission Merit Listsakal

पुणे - इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरूवार (ता. ६ ) पासून अर्ज भरता येणार आहे. तसेच दुसऱ्या फेरीमध्ये प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये पसंतीक्रम अर्ज भाग दोन लॉक करून सहभागी होता येणार आहे.

तिसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील, अन्यथा त्यांचे मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेले, प्रवेश फेरी दोनमध्ये प्रथम पसंतीरम मिळालेले (प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले) विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित असतील. या फेरीत अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील.

ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील का नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल. प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील.

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

- ६ ते ९ जुलै - प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी अर्ज भाग एक भरू शकतात. अर्ज भाग एकमध्ये दुरूस्ती करता येईल, कोटा व द्विलक्षी प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोदविता येईल.

- १० व ११ जुलै - पात्र उमेदवारांची यादी करणे तसेच विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्व परीक्षण.

- १२ जुलै - निवड यादी प्रसिध्द करणे.

- १२ ते १४ जुलै - कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे.

- १४ जुलै - पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com