Eleventh Admission : अकरावीच्या प्रवेशाची तिसरी विशेष फेरी जाहीर

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत तिसरी विशेष फेरी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता.८) नवीन नोंदणी, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार.
Admission
Admissionesakal

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत तिसरी विशेष फेरी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता.८) नवीन नोंदणी, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीला प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या झाल्या आहेत.

आता शिक्षण विभागाने तिसरी विशेष फेरी जाहीर केली आहे. या फेरीचे वेळापत्रक ‘https://pune.11thadmission.org.in/’ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

या प्रवेश फेरींतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करण्यासाठी, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आणि नवीन नोंदणी करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत आहे.

‘कॅप’अंतर्गत प्रवेश फेरीच्या कामकाज बुधवारपर्यंत (ता.९) चालेल. त्यानंतर फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी (ता.१०) सकाळी दहा वाजता जाहीर केली जाईल. यात प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १० ते १२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com