esakal | नव्वदीपार गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील चुरस तिसऱ्या फेरीतही कायम
sakal

बोलून बातमी शोधा

admission

नव्वदीपार गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील चुरस तिसऱ्या फेरीतही कायम

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : यंदा अकरावीसाठी शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील चुरस तिसऱ्या नियमित फेरीतही कायम असल्याचे पाहायला मिळाले. नामांकित महाविद्यालयांचा पहिल्या यादीतील आणि तिसऱ्या यादीतील ‘कट-ऑफ’मध्ये अवघ्या एक ते दोन कमी झाल्याचे निदर्शनास आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत तिसऱ्या नियमित फेरीची प्रवेश यादी सोमवारी जाहीर झाली.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पदव्युत्तर परीक्षा पुढे

यावेळी महाविद्यालयांमधील प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ देखील जाहीर करण्यात आला. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा पहिल्या फेरीतील कट-ऑफ हा ९६.४० टक्के (४८२ गुण) होता, तर तिसऱ्या फेरीत हा कट-ऑफ अवघ्या तीन गुणांनी (९५.८० टक्के/४७९) घसरला आहे. तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा तिसऱ्या फेरीतील कट-ऑफ ९२.४० टक्के (गुण-४६२) इतका आहे. या महाविद्यालयाचा पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचा कट-ऑफ अवघ्या दोन गुणांनी घसरला आहे.

तिसऱ्या फेरीत काही महाविद्यालयांचा वाढला कट-ऑफ

तर तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी त्यांचे पसंतीक्रम बदलल्याने काही नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ हा पहिल्या फेरीपेक्षा वाढल्याचे दिसून आले. सिंबायोसिस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा पहिल्या यादीतील कट-ऑफ ९१ टक्के होता, तो तिसऱ्या फेरीत ९२.८०टक्के इतका झाला आहे. तसेच बीएमसीसीचा पहिल्या यादीतील कट-ऑफ ९५.२०टक्के इतका होता, तो तिसऱ्या फेरीत ९६.४० टक्के इतका आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयांचा अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील ‘कट-ऑफ’

महाविद्यालयाचे नाव : शाखानिहाय कट-ऑफ (टक्केवारीत)

महाविद्यालयाचे नाव : कला : वाणिज्य : विज्ञान

 • *फर्ग्युसन महाविद्यालय : --- : --- : ९५.८० टक्के

 • *बीएमसीसी : --- : ९६.४० टक्के : ---

 • *सिंबायोसिस महाविद्यालय : ९४.६ टक्के : ९२.८० टक्के : ---

 • *स. प. महाविद्यालय : ८८.४० टक्के (मराठी माध्यम) : ८८.८० टक्के : ९२.४० टक्के

 • *विमलाबाई गरवारे महाविद्यालय : ---- : ८५.८० टक्के : ८८.४० टक्के

 • *मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) : ७६.८० टक्के (मराठी माध्यम) / ८९.८० (इंग्रजी माध्यम) : ८८.२० टक्के : ९२.६० टक्के

 • *लक्ष्मणराव आपटे महाविद्यालय : --- : ७८.४०टक्के : ९५.२० टक्के

 • *आबासाहेब गरवारे महाविद्यालय : --- : --- : ९०.६० टक्के

 • *महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय : --- : --- : ९२.८० टक्के

 • *नेस वाडिया : --- : ८५.८० टक्के :

 • *नौरोसजी वाडिया : ८७.२० टक्के (इंग्रजी माध्यम) : --- : ८७.६० टक्के

loading image
go to top