Positive News: कोरोनाकाळात नोकरी गेलीय? मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घ्या

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

2020च्या सुरुवातीला आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आज जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. या काळात उद्योग, व्यवसाय आणि व्यापार बंद असल्याने करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली : 2020च्या सुरुवातीला आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आज जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. या काळात देशातील उद्योग, व्यवसाय आणि व्यापार बंद असल्याने करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लाखो लोकांच्या पगारात कपातही करण्यात आली आहे. अशा काळात ESIने 'अटल बिमित व्यक्ती कल्याण' (ABVKY) योजनेचा कार्यकाल वाढवला आहे. या योजनेद्वारे 31 डिसेंबरच्या अगोदर नोकरी गेलेली असेल तर, त्यांना बेरोजगार भत्ता म्हणून 25% टक्के बेरोजगार भत्ता मिळणार आहे. यासाठी लाभार्थी व्यक्तीला प्रतिज्ञापत्राचा अर्ज द्यावा लागणार आहे.

योजनेला मुदतवाढ
ही योजना 1 जुलै 2018 पासून लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. आता  ईएसआय कॉर्पोरेशनने अटल बीमित कल्याण योजनेचा कार्यकाल 1 जुलै 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत आणखी एक वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर: Share Market: मोठ्या पडझडीनंतर भांडवली बाजार तेजीत

कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या विमाधारकांना पात्रता अटी शीथिल करण्याबरोबरच या योजनेअंतर्गत बेरोजगारी भत्ता दर 25 टक्के केला आहे जो यापुर्वी 50 टक्के होता. सध्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बेरोजगारीच्या लाभाचा दावा कंपनीला सादर करणे आवश्यक होते. पण, आता हा दावा आता थेट नामांकित ESICच्या एखाद्या शाखेच्या कार्यालयाकडे सादर केला जाऊ शकतो. या योजनेतील वाढीव लाभ आणि शीथिल केलेल्या अटी 24 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत लागू असणार आहेत. 

काय सुविधा मिळणार?
ही सवलत थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी ESICच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, सध्या ESIC कामगारांच्या सुमारे 3.49 कोटी कुटुंबांना सेवा पुरवत आहे. तसेच ESIC आपल्या 13.56 कोटी लाभार्थ्यांना रोख लाभ आणि वाजवी दरातील वैद्यकीय सेवा पुरवत आहे. आज ESICच्या पायाभूत सुविधांमध्ये 1520 दवाखाने, 307 आयएसएम युनिट्स आणि 159 ESIहॉस्पिटल्स, 793 शाखा/वेतन कार्यालये आणि 64 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालये ही सुविधा देशातील 34 राज्यातील 566 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

Gold prices: मागील 3 दिवसांत सोने दुसऱ्यांदा उतरले; जाणून घ्या आजची किंमत

योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी-
1. विमाधारकाने बेरोजगार होण्यापुर्वी कमीत कमी 2 वर्षे नोकरी केलेली असावी. या काळात त्या व्यक्तीने कमीत कमी 78 केलेले पाहीजे.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत क्लेम करावा लागेल.
3. क्लेम फॉर्म ESICच्या शाखेच्या कार्यालयात भेटेल. तसेच तुम्ही ESICच्या वेबसाईटवरूनही हा फॉर्म डाऊनलोड करू शकता.

ESICची वेबसाईट- https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793...

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eligibility and benefits central government extends atal bimit vyakti kalyan yojana