अभियांत्रिकी व MBA प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक कल

Students admission
Students admissionsakal media

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा अभियांत्रिकी पदवी (engineering degree), एमबीए (MBA), अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे यामुळे या प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आल्याची माहिती आज सीईटी (CET Cell) सेलकडून देण्यात आली. सीईटी सेलकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर आज ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Students admission
भांडवली बाजारमूल्याबाबत HDFC समूह दुसऱ्या क्रमांकावर

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा औषधनिर्माणशास्त्र पदवी, आर्कीटेक्चर या अभ्यासक्रमांना मात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपला कमी प्रतिसाद दिल्याचेही समोर आले आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंन्ट, आर्कीटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थातील सुमारे 4 लाख जागावरील प्रवेश हे सीईटीच्या गुणावरच दिले जातात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी चुरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदाच्या प्रवेश अर्ज नोंदणीत बहुताश अभ्यासक्रमांच्या अर्जात वाढ झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्या होत्या. यामुळे गतवर्षी नोंदणी आणि प्रवेश प्रक्रियेवर परिणाम दिसला होता. यंदा मात्र नोंदणीत वाढ झाल्याने यंदा जागा गतवर्षीच्या तुलनेत भरतील अशी शक्यता आहे.

या अभ्यासक्रमात झाली वाढ

नोंदणीत वाढ असलेले अभ्यासक्रम

अभ्यासक्रम वर्ष 2020-21 वर्ष 2021-22

पदवी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान 96337 107732

एमबीए/एमसीए 42814 54227

मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स 10142 10855

हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग तंत्रज्ञान 9 12 (नोंदणी सुरु आहे)

मास्टर ऑफ फार्मसी 4991 5273

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी 62485 69448

थेट द्वितीय वर्ष पदवी फार्मसी 10272 12374

बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 5567 3465

बॅचलर ऑफ फार्मसी 65269 58349

हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग तंत्रज्ञान 598 509

मास्टर ऑफ आर्किटेक्चर 632 433

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदव्युत्तर 8249 4057

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com