उत्साह आणि इच्छाशक्ती

कुठल्याही कार्याचे यश त्या विषयावरचे प्रभुत्व, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यावर अवलंबून असते.
Enthusiasm and Willpower
Enthusiasm and Willpowersakal
Updated on: 

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

कुठल्याही कार्याचे यश त्या विषयावरचे प्रभुत्व, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यावर अवलंबून असते. या तिन्ही गोष्टी लहान मोठ्या फरकाने सारख्याच महत्त्वाच्या आहेत. आपल्यामध्ये कामाचा किती उत्साह आहे, त्यावर आपली कामगिरी अवलंबून असते.

त्या प्रमाणात आपल्यावर कामाची जबाबदारी टाकली जाते. तुम्ही करिअरची नव्याने सुरुवात केली असेल आणि संभ्रमात असाल की तुम्हाला का जबाबदारी दिली जाते नसेल, तर अवश्य या गोष्टीचा विचार करा. तुम्ही आत्मपरीक्षण केल्यास लगेच त्याचे उत्तर मिळेल.

आपला उत्साह दांडगा असल्यास आपल्यातील दुसऱ्या न्यूनतेवर मात करता येते. उत्साही माणसे दुसऱ्यांमध्ये देखील उत्साह आणि काही नवीन करण्याची ऊर्जा भरतात. त्यामुळे स्वतः उत्साही राहावे आणि उत्साही लोकांच्या संगतीत राहावे म्हणजे नैराश्य दूर राहते. स्वतःला उत्साही ठेवणे ही कला आहे.

त्यासाठी आजकाल नवनवीन उपक्रम आणि कार्यशाळा होत आहेत. तथापि हे फक्त शिकून नाहीतर आपल्या जीवनात अवलंबणे आवश्यक आहे. आधीच्या लेखांमध्ये खेळाचे, कलेचे महत्त्व समजावून घेतले आहे. मनाला उत्साही ठेवण्यासाठी हे सगळे केले पाहिजे.

उत्साहाला इच्छाशक्तीचे पंखबळ मिळाले तर व्यवसाय, नोकरी, शिक्षण कुठल्याही क्षेत्रात उंच भरारी नक्कीच. इच्छाशक्तीच्या बळावर अशक्यप्राय गोष्टीही शक्य होऊ शकतात. रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या ४९व्या वर्षी नोबेल पारितोषिक विजेता ‘गीतांजली’ काव्यसंग्रह लिहिला. हे केवळ त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच. त्यांनी ७०व्या वर्षी चित्रे काढायला सुरुवात केली.

फक्त उत्साह आणि इच्छाशक्तीच्या बळावर. नाहीतर जग हे कितीतरी कलाक्षेत्रात निपुण लोकांनी भरलेले आहे. मराठीत एक सुंदर वाक्य आहे, ‘इच्छा तिथे मार्ग.’ आणि त्याला उत्साहाचं आणि कर्तृत्वाची जोड मिळाली तर यशाचा मार्ग सापडेलच. इच्छाशक्ती वाढवायचे अनेक प्रकार आहेत. एकाग्रता, ध्यान, मानसिक आणि शारीरिक व्यायाम नियमितपणे केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.

याशिवाय तुम्ही स्वतःच कंपनी चालवत असाल किंवा मानव संसाधन विभाग सांभाळत असाल तर कर्मचाऱ्यांचे मनोबल तसेच उत्साह वाढविण्यासाठी ‘आउटिंग’, सामूहिक व सांघिक खेळ, स्पर्धा महत्त्वाची भूमिका निभावतात.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अगदी आयपीएलच्या पॉवर प्लेसारखे खेळले पाहिजे. जेवढा दांडगा तुमचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा तेवढी तुमची शर्यतीत पुढे जाण्याची शक्यता जास्त.

स्वतःला सतत प्रेरित करीत राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही कार्यशाळा, कोर्सेसही उपलब्ध आहेत. ही ‘सॉफ्ट स्किल’ कुठल्याही क्षेत्रात उपयोगाला येतात. सध्याच्या स्पर्धेच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, तिथे ही कौशल्यच तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळे ठरवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com