
थोडक्यात:
आज भारतीय शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात झाली असून सेन्सेक्स घसरला तर निफ्टी स्थिर राहिला.
फार्मा आणि मेटल क्षेत्रात दबाव असून आयटी शेअर्समध्ये सौम्य वाढ झाली आहे.
अमेरिकन बाजारातील महागाईमुळे जागतिक गुंतवणूकदार सावध असून याचा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे.
Stock Market Opening Today: आज 16 जुलै 2025 रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बीएसईचा सेन्सेक्स 36 अंकांनी घसरून 82,534 वर उघडला, तर एनएसईचा निफ्टी 1 अंकाने वधारून 25,196 वर उघडला.
बँक निफ्टीने मात्र चांगली सुरुवात केली असून तो 105 अंकांनी वधारून 57,111 वर उघडला. आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 17 पैशांनी घसरून 85.98 रुपये प्रति डॉलर या पातळीवर उघडला.