शिक्षणक्रमांच्‍या प्रवेश अर्जाला मुदतवाढ; CET सेलचा निर्णय | Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admissions

शिक्षणक्रमांच्‍या प्रवेश अर्जाला मुदतवाढ; CET सेलचा निर्णय

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्‍यात उद्‌भवलेल्‍या तणावाच्‍या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सीईटी (CET) सेलने परिपत्रक जारी केले आहे.

विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाकरिता विद्यार्थी नोंदणी करत आहेत. या अभ्यासक्रमांच्‍या नोंदणी प्रक्रियेच्‍या कालावधीदरम्‍यान अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी व इंटरनेट सेवा बंद असल्‍यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणी निर्माण झाल्‍या होत्‍या. उमेदवारांच्‍या शैक्षणिकहिताचा विचार करता पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या वेळापत्रकाला मुदतवाढ दिली असल्‍याचे परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक : जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑफलाइन अर्जही स्विकारणार

विहित मुदतीत ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्‍यांची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर प्रारूप व पुढे अंतिम गुणवत्तायादी तयार केली जाईल. या यादीच्‍या आधारे विद्यार्थ्यांना कॅप राउंडमध्ये महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभागी राहाण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नोंदणी करणे अत्‍यंत आवश्‍यक असणार आहे.

शिक्षणक्रमनिहाय मुदतवाढ

शिक्षणक्रम -------------- नोंदणी मुदत

एम. आर्किटेक्‍ट--------१९ नोव्‍हेंबर

एमसीए---------------२२ नोव्‍हेंबर

एम.फार्मसी------------१९ नोव्‍हेंबर

एम.ई/एम.टेक.--------१९ नोव्‍हेंबर

बी. आर्किटेक्‍चर-------२० नोव्‍हेंबर

डीएसई--------------२० नोव्‍हेंबर

डीएसपी-------------२० नोव्‍हेंबर

बी.एचएमसीटी--------१८ नोव्‍हेंबर

बी.ई/बी.टेक.---------२१ नोव्‍हेंबर

बी. फार्मसी-----------२३ नोव्‍हेंबर

एमबीए--------------२२ नोव्‍हेंबर

हेही वाचा: साईबाबांच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पासची गरज नाही

loading image
go to top