‘मुक्त व दूरस्थ’च्या बीए., बी.कॉम प्रवेशासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बी.ए आणि बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी यापूर्वी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

‘मुक्त व दूरस्थ’च्या बीए., बी.कॉम प्रवेशासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अभ्यास प्रशालेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष बी.ए आणि बी. कॉम या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश शुल्क भरून प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बी.ए आणि बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी यापूर्वी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता ही मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रशालेमार्फत जाहीर केली आहे. दरम्यान, प्रशालेकडून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची देखील प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.