अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी होणार जाहीर

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत.
Merit List
Merit ListSakal
Summary

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत.

पुणे - राज्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या (बी.ई /बी.टेक) प्रवेश प्रक्रियेतील अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी (ता.१२) जाहीर होणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ई आणि बी.टेक) पहिल्या वर्षाच्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- इंटिग्रेटेड पाच वर्ष) प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

यंदा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करावीत, अशी सूचना सीईटी सेलने दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी ‘https://cetcell.mahacet.org/’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी सेलने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com