प्रयत्न करूनही यश मिळत नाही? मग वाचा 'हे' पाच नियम अन् स्वतःमध्ये बदल करून मिळवा यश

टीम ई सकाळ
Wednesday, 17 February 2021

यशस्वी लोकांमध्ये स्वयंशिस्त असते, तर अशस्वी लोकांमध्ये याचा अभाव असतो. मात्र, तुमच्यामध्येही स्वयंशिस्त नसेल तर काळजी करू नका. आज यशस्वी होण्याचे ५ नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नागपूर : आजच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. मात्र, प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यासाठी प्रयत्न करूनही अनेकजण कंटाळतात. मात्र, जे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच यश मिळते. यश आणि अपयशामध्ये फक्त स्वयंशिस्तीचा फरक असतो. यशस्वी लोकांमध्ये स्वयंशिस्त असते, तर अशस्वी लोकांमध्ये याचा अभाव असतो. मात्र, तुमच्यामध्येही स्वयंशिस्त नसेल तर काळजी करू नका. आज यशस्वी होण्याचे ५ नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या नियोजनावर ठाम राहणे -
तुम्ही एखादे नियोजन तयार केले असेल, तर त्यावर ठाम राहायला हवे. तरच तुम्हाला यश मिळेल. जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल आणि तुमच्या एक्स-बॉयफ्रेंडला फोन करायची इच्छा होत असेल. पण ते तुमच्यासाठी आणि परिवारासाठी चांगले नसेल, तर तुम्ही त्याच्यासोबत बोलणे टाळायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्याला विसरण्यात यशस्वी होऊ शकाल. म्हणजेच तुम्ही जी गोष्ट करायची ठरविली आहे, ती करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टी आकर्षित करत असतील तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, तुम्ही ते सहन करण्याची क्षमता ठेवायला हवी.

हेही वाचा - Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

तुमचे नियोजन मनाला वारंवार सांगा -
आपण ज्या गोष्टी करणे आवर्जून टाळायचे असते, त्याच गोष्टी सातत्याने मनात आणि डोक्यात येत असतात. आपले अस्थिर मन सातत्याने त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सांगत असते. मात्र, यावेळी तुम्ही स्वतःच्या मनाला समजवायला पाहिजे. यावेळी स्वतःला मोटीव्हेट करणारे कोट्स वाचा. त्यामुळे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. 'मी हे करू शकते' किंवा 'मला माझे ध्येय्य साध्य करायचे आहे आणि त्यासाठी मी अगदी योग्य दिशेने काम करत आहे' या गोष्टीचा विचार सातत्याने डोक्यात असू द्या. त्यामुळे यश लवकरच तुमच्या पदरी पडेल.

यशस्वी झाल्यानंतरच्या भावनांचा विचार करा -
तुम्हाला एखादे काम करायचे असेल, तर त्यामधून तुम्हाला काय साध्य करायचे आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच येणाऱ्या निकालावर तुम्हाला लक्ष द्यायचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कर्ज काढून एखादी कार  घेतली असेल आणि ते कर्ज पूर्णपणे फेडले असेल, तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. कारचे कर्ज फेडल्यानंतर होणार जो आनंद आहे, तो तुम्ही कर्ज फेडताना केला तर नक्कीच तुम्हाला नक्की यश मिळेल.

हेही वाचा UPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट

परिस्थितीला बदलण्याचे सामर्थ्य -
एखाद्या वेळी आपण ठरवतो, की आपल्याला या महिन्यात कमी खर्च करायचा आहे. मात्र, त्याच काळात तुम्हाला मित्र बाहेर जाण्यासाठी आग्रह करत असतात. तुमचे मन देखील जाण्यासाठी उत्सुक असते. मात्र, तुम्ही गेले तर तुमचा महिन्याचा बजेट कोलमडण्याची शक्यता असते. अशावेळी मित्रांसोबत जा पण खर्च कमी करा. त्यावेळी काही गोष्टी तुम्ही आकर्षित करतील. मात्र, तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल.

वारंवार चुका करणे टाळा -
तुम्ही वारंवार चुका करत असाल, तर त्या चुका नेमक्या का होतात? याचा अभ्यास करणे गरजेचे असते. तुम्हाला कारण सापडल्यानंतर ते नेहमी सोबत ठेवा. ज्यावेळी चूक झली त्यावेळी या कारणांचा विचार करा. उदारहरण घ्यायचे झाले, तर तुम्हाला जेवणानंतर शतपावली घालणे का गरजेचे आहे? हे समजून घ्या. यावेळी तुमचे मन मस्त सोफ्यावर बसून टीव्ही पाहा, असे सांगेल. मात्र, त्यावेळी शतपावली घातल्याने तुम्हाला काय फायदा होईल? याचा विचार करा. त्यानंतर काय करायचे याचा निर्णय घ्या. या सर्व लहान-लहान गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही काम केले तर नक्कीच यशाचे शिखर दूर नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five rules of success nagpur news