UPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट

Students
Students

UPSC CSE Prelims 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर वैकल्पिक असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड उमेदवाराला करावी लागेल. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा असेल. उमेदवाराचे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे. 

पेपर-१ मध्ये विविध ७ विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडींचा समावेश असेल. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर कटऑफ लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळते, ते मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकतात. 

त्यानंतर मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीची फेरी गाठतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या आधारे अंतिम पात्र उमेदवारांची निवड केली जाते. 

दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल झाला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण यूपीएससीने पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

- UPSCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com