Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

Countries Where Education Costs Nothing!: भारतात शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढला असून सर्वसामान्यांसाठी दर्जेदार शिक्षण घेणे कठीण होत आहे. अशातच जगातील काही देशांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत किंवा फार कमी फी मध्ये शिक्षण दिले जाते.
Free Schooling: These Countries Make Education Free!

Free Schooling: These Countries Make Education Free!

esakal 

Updated on

Best Countries For Free Education!: भारतामध्ये शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस गगनाला भिडत असून, सर्वसामान्य पालकांसाठी मुलांचे शिक्षण ही एक मोठी आर्थिक कसोटी ठरत आहे. अलीकडेच नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि वाढत्या शैक्षणिक महागाई विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. भारतात नर्सरीपासूनच खासगी शिक्षण महाग झाले असताना, जगातील अनेक विकसित देशांमध्ये मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. जगातील प्रमुख देशांमध्ये शिक्षणाची काय व्यवस्था आहे,हे जाणून घेवूयात..

जर्मनी (Germany)

जर्मनीमधील सर्व सरकारी (Public) विद्यापीठांमध्ये देशातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण (पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण) पूर्णपणे मोफत आहे. येथे कोणतीही ट्युशन फी आकारली जात नाही. विद्यार्थ्यांना फक्त प्रशासकीय खर्चासाठी आणि सार्वजनिक वाहतूक पाससाठी दर सत्रानुसार (Semester) साधारण १०० ते ३०० युरो इतके नाममात्र शुल्क द्यावे लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com