esakal | सरकारी नोकरी : फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियात भरती; पोस्ट ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Forest_Survey_India

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

सरकारी नोकरी : फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियात भरती; पोस्ट ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

FSI Recruitment 2021 : पुणे : फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने टेक्निकल असोसिएट्स पदाच्या ४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून पदव्युत्तर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. याबाबतचा अधिक तपशील पुढे देण्यात येत आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही भरती भाडे करार तत्वावर (कॉन्ट्रॅक्ट बेसिस) करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करावेत. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. भूगोलमधून एमए किंवा एमसीए किंवा आयटी/ सीएसमध्ये एम. एसस्सी केलेले असावेत. तसेच उमेदवाराला डीआयपी / जीआयएसचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

परीक्षा न देताही मिळणार रेल्वेत नोकरी; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज

असा करा अर्ज
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरल्यास तो नाकारला जाऊ शकतो. याबाबतची लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे. 

वयोमर्यादा 
जास्तीत जास्त ३० वर्षे वयाचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. राखीव गटातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येणार आहे. वय १ एप्रिल २०२१ पासून मोजले जाईल.

NEET 2021 : मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि हँड्स-ऑन टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

- फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- अधिकृत अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top