esakal | NEET 2021 : मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Medical

नीटची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल, असं पूर्वी जाहीर करण्यात आलं होतं, पण आता नीट (NEET UG) परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाणार आहे.

NEET 2021 : मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

NEET 2021 : नवी दिल्ली/पुणे : राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी (ता.१२) नीट परीक्षेची तारीख जाहीर केली. एनटीएने अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १ ऑगस्टला नीट परीक्षा आयोजित केली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा एकूण ११ भाषांमध्ये घेण्यात येईल.

परीक्षा न देताही मिळणार रेल्वेत नोकरी; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज

एनटीएने म्हटलं आहे की, जेव्हा नीटसाठी अर्ज जमा करण्यास सुरवात होईल, तेव्हा परीक्षा, अभ्यासक्रम, वयाच्या पात्रतेचे निकष, आरक्षण, जागांचे वर्गीकरण, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र, राज्याचे कोड या संदर्भात सविस्तर माहिती देणारी पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येईल. नीट २०२१साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरवर्षी सुमारे १.४ दशलक्ष विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अर्ज करतात.

सॅलरी निगोशिएशनसाठी काही महत्वाच्या टिप्स, मिळेल मनासारखा पगार​

नीटची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल, असं पूर्वी जाहीर करण्यात आलं होतं, पण आता नीट (NEET UG) परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक विनीत जोशी यांनी जाहीर केलं की, नीट यूजी परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. एमबीबीएस/ बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल.

ऑफिसमध्ये प्रभावी देहबोलीचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या सविस्तर​

पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी उमेदवाराचे वय १७ ते २५ वर्षे च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांना अर्जासह दहावी, बारावी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट क्रमांक, बँक खात्याचा तपशील यासह कागदपत्रांच्या स्कॅन प्रती जमा कराव्या लागतील. यासह, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सही आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे सादर करावे लागतील.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top