
GATE 2023 : पदवीधर अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूरने अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज (GATE 2023) प्रक्रिया सुरू केली आहे. GATE 2023 परीक्षेस बसू इच्छिणारे सर्व उमेदवार gate.iitk.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. परीक्षा 4,5,11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. (GATE 2023)
GATE 2023 साठी अशी करा नोंदणी
१. - अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट gate.iitk.ac.in वर जा.
२. - त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
३. - लिंकवर क्लिक केल्यानंतर, सर्व आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
४. - नोंदणी केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे, स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करून GATE 2023 अर्ज भरा.
५. - फॉर्म भरल्यानंतर, GATE 2023 अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
६. - सबमिशन केल्यानंतर शेवटी फॉर्म डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
शैक्षणिक पात्रता
GATE 2023 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षात उत्तीर्ण केलेले असावे. यासोबतच अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य आणि कला या विषयातील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त पदवी कार्यक्रमातून शिक्षण पूर्ण केलेले उमेदवारही परीक्षेला बसण्यास पात्र आहेत.