10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी Airforce मध्ये सुवर्ण संधी, अर्जसाठी 27 एप्रिल शेवटची तारीख

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2022 आहे.
Indian Air Force Recruitment 2022
Indian Air Force Recruitment 2022 sakal

भारतीय हवाई दलात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय हवाई दलाने मल्टी टास्किंग स्टाफ, कारपेंटर, हाउसकीपिंग स्टाफ आणि हिंदी टाइपिस्टच्या पदांसाठी नोकरभरती करत आहे. विशेष बाब म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन नोंदणी करु शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट वर भेट द्या. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2022 आहे. (golden opportunity for 10th 12th pass indian air force recruitment 2022 for group c civilian posts)

Indian Air Force Recruitment 2022
राज्यातील खासगी शाळांमध्ये आरटीईच्या प्रवेशांना २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्यांमधील कामगिरीवरुन तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

पदांबाबत तपशील

एकूण 5 पदांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ, कारपेंटर, कुक, हाउसकीपिंग स्टाफ आणि हिंदी टाइपिस्टच्या पदांसाठी यांच्या प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे.

Indian Air Force Recruitment 2022
प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून‘११ महिने’भाडेकरारास मान्यता

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण उमेदवार मल्टी टास्किंग आणि हाउसकीपिंग स्टाफ पदांसाठी अर्ज करू शकतात. कारपेंटर पदांसाठी 10वी उत्तीर्ण, कूक पदांसाठी केटरिंगमधील डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण आणि हिंदी टंकलेखक पदांसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा

18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तथापि, ओबीसी श्रेणीसाठी 18 ते 28 वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com