CRPF मध्ये परीक्षेशिवाय अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पगार 72000 रूपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF Recruitment 2022
CRPF मध्ये परीक्षेशिवाय अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पगार 72000 रूपये

CRPF मध्ये परीक्षेशिवाय अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पगार 72000 रूपये

CRPF Recruitment 2022: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये नोकरी (Government Jobs) मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. CRPFने डेप्युटी कमांडंटची (DC) पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (CRPF भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CRPFच्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून आहे.

याशिवाय, उमेदवार https://crpf.gov.in/recruitment.htm या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE या लिंकखाली अधिकृत अधिसूचना पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 11 पदे भरली जातील.

हेही वाचा: IIT Mumbaiमध्ये अभियंत्यांसाठी नोकरीची संधी

महत्वाच्या तारखा-

DIGP, GC, CRPF, गुवाहाटी, आसाम - 26 मे 2022

DIGP, GC, CRPF, हैदराबाद, तेलंगणा - 01 जून ते 02 जून

रिक्त जागांचा तपशील-

एकूण पदांची संख्या- 11

हेही वाचा: ITBP : बारावी उत्तीर्णांना नोकरीची संंधी; पगार २५ हजार ते ९३ हजार रुपये

पात्रता निकष-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Tech / ME पदवीसह बांधकाम आणि देखभाल, BOQ तयार करणे, कराराची कागदपत्रे / NIT इत्यादींचा किमान 5 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा-

उमेदवाराचे वय ४५ वर्षे असावे.

पगार-

उमेदवारांना 75000 रुपये प्रतिमाह पगार दिला जाईल.

Web Title: Golden Opportunity To Become An Officer In Crpf Without Examination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top