किचनमध्ये आहे चांगले करिअर; कधी विचार केला का?

Good Career In kitchen
Good Career In kitchenGood Career In kitchen

नागपूर : प्रत्येकाच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. पुढे चालून त्याच क्षेत्रात त्यांना करिअर करायचे असते. त्यामुळेच अनेकजण आवडीनुसार क्षेत्र निवडून करिअर करीत पुढे जातात. स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्यांनाही किचनमध्ये करिअर करण्याची संधी आहे. जेवण बनवण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र चांगल करिअर ऑप्शन आहे.

टीव्ही सुरू केली की कोणत्या ना कोणत्या चॅनलवर रेसिपी शो सुरू असतो. यात नवीन काहीही नसले तरी रेसिपी बनवून दाखवणारे बरेचसे पुरुषच असतात. यावरून स्त्रियांएवढेच टेस्टी फूड पुरुषही बनवू लागले आहेत. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राचे प्रस्थ जसे वाढू लागले, तसे आचारी, स्वयंपाकी यांनाही चांगले दिवस आले आणि त्यांना ‘शेफ’ अशी पदवी मिळाली. यामध्ये करिअर करून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो. या क्षेत्रात कुठेकुठे आहे संधी हे जाणून घेऊ या...

फूड फोटोग्राफर

नेहमीच काहीतरी क्रिएटिव्ह करू इच्छिणाऱ्या लोकांना फूड इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची चांगली संधी आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घेत फोटोग्राफीची आवडही पूर्ण करू शकता.

फूड क्रिटिक

फूड क्रिटिकमध्ये करिअर करण्यासाठी लिहिण्याच्या आवडीबरोबरच अभिव्यक्तीची कला अवगत असणे गरजेचे आहे. लिखाणाच्या माध्यमातून पदार्थांच्या रेसिपीज लोकांपर्यंत पोहोचवता येतील.

Good Career In kitchen
सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

न्युट्रिशनिस्ट

तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याच्या कलेबरोबरच इतरांना चांगल्या पद्धतीने सांगता येत असेल तर तसेच त्याचे फायदे व तोट्यांची माहिती लोकांना देता येत असेल तर न्युट्रिशनिस्ट म्हणून करिअर करण्याची चांगली संधी आहे.

शेफ

अनेकांना टाइमपास म्हणून काही तरी खाण्याची वस्तू तयार करण्याची सवय असते. अशा लोकांनी कुकिंगच्या क्षेत्रात नक्कीच करिअर करायला हरकत नाही. चांगले जेवण तयार करणारा व्यक्ती शेफ पदापर्यंत पोहोचून करिअर करू शकतो.

केटरर

केटररमध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. लग्न, पार्ट्या, छोटे-मोठे कार्यक्रमांनामध्ये चांगली संधी आहे. आता प्रत्येकाच्या घरी केटररकडून स्वयंपाक करून घेतला जात असल्याने व्यवसाय पुढे नेण्यास मोठी मदत होऊ शकते.

Good Career In kitchen
वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

बेकर

चांगल्या बेकर्सला या क्षेत्रात नेहमीच मागणी असते. केक, नानकटाई तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज प्रत्येक ठिकाणी मिळतात. तुम्ही चांगले बेकर असाल तर त्यामध्ये करिअर करू शकता.

फूड स्टायलिस्ट

वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच त्याचे प्रेझेंटेशनही महत्त्वाचे असते. असे जर तुम्हाला जमत असेल तर फूड स्टायलिस्टच्या माध्यमातून मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच वर्कशॉप्समध्ये पदार्थांविषयीची माहिती पोहोचवता येऊ शकते. यात चांगली संधी आहे.

आइस्क्रिम टेस्टर

तुम्हाला स्वीट खाण्याची आवड असेल तर आइस्क्रिम टेस्टर म्हणून करिअर घडवू शकता. यामध्ये चांगल्या प्रकारे जॉब करता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com