वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य | Health News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वात, पित्त, कफ

वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

नागपूर : आयुर्वेदाने वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष सांगितले आहेत. निरोगी रहाण्यासाठी या तीन दोषांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये तज्ज्ञमंडळी दोष ओळखून उपायोजना करतात. दोषानुसार आहार व व्यायामाचा सल्ला दिला जातो. आहाराचा आणि या दोषांचा जवळचा संबंध आहे. आयुर्वेदानुसार शरीरातले दोष आणि पेय यांचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच कोणती पेय प्यायला हवीत याबाबत जाणून घेऊ या...

शरीरातील या दोष आणि विकारांना ओळखून उपयुक्त उपचार घेऊन शरीराला पुन्हा संतुलित करू शकतो. जेंव्हा अस्पष्टता, अकारण भीती किंवा शरीरावर लाल चट्टे दिसतील तेंव्हा लक्षात येईल की शरीरात कोणता दोष निर्माण झाला आहे. एखाद्या व्यावसायिक वैद्याद्वारे त्या दोषावर उपाय करू शकता. शरीराला विकारांपासून वाचवण्याचा एकमात्र रामबाण उपाय आहे या त्रिदोषांना संतुलित राखणे.

वात

वात दोषामुळे शरीर कोरडे पडते. हा दोष असणाऱ्यांनी जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन केले पाहीजे. फळ, भाज्या व इतर द्रवपदार्थांचे सेवन करून पाण्याची गरज भागवू शकता. आरोग्य राखण्यासाठी हर्बल चहा, दूध, फळ आणि भाज्यांचे रस यांचे सेवन करता येईल. ब्लॅक टी, ग्रीन टी, कॉफी, कॅफेनयुक्त पेय, फसफसणारी पेय यांचे सेवन टाळा.

पित्त

पित्त असणाऱ्यांनी मध्यम प्रमाणात पाणी प्यावे. पित्त दोष असणाऱ्यांना खूप थंडी वाजते. हे लोक मध्यम बांध्याचे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमांचे प्रमाणही अधिक असते. या लोकांनी नारळाचे पाणी, हिरव्या भाज्यांचे रस, गोड फळांचे रस, जास्वंद, लवेंडर, गुलाब तसेच जास्मिन फ्लेवरचे हर्बल टीही पिता येईल. बीयर, वाईन तसेच आंबट फळांचे सर टाळा.

कफ

कफ दोष असणाऱ्यांना पाणी कमी प्रमाणात प्यायले तरी चालते. कफ प्रवृत्तीची व्यक्ती शांत, समजूतदार आणि इतरांना माफ करणारी असते. या लोकांनी गरम, काळा किंवा ग्रीन टी प्यावा. त्यांना भाज्यांचा रसही पिता येईल.