कोणत्याही क्लासेसला न जाता आयआयटीमध्ये झाली निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aakash Bansode

कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो हे नऱ्हे येथील आकाश बनसोडे याने दाखवून दिले आहे.

कोणत्याही क्लासेसला न जाता आयआयटीमध्ये झाली निवड

पुणे - कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो हे नऱ्हे येथील आकाश बनसोडे याने दाखवून दिले आहे. आर्इ रुग्णालयामध्ये मावशी म्हणून तर वडील एका उत्पादन कंपनीत कार्यरत असलेल्या आकाशची १९६ रँक मिळवून आयआयटी पवई येथे निवड झाली आहे.

बेताची आर्थिक परिस्थिती आणि वनआरकेमध्ये राहणाऱ्या आकाशने कुठल्याही खासगी क्लासेसला न जाता स्वतः अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. पहिल्या प्रयत्नात मेन्समध्येच बाहेर पडलेल्या आकाशने दुसऱ्या प्रयत्नात थेट पहिल्या २०० रँकिंगमध्ये नंबर मिळवला. आकाशचे पूर्ण देशातील रँक ही आठ हजार असून प्रवर्गातून त्याला १९६ रँकिंग मिळाले आहे. जेर्इच्या मेन्स परिक्षेसाठी देशात एकूण साडेनऊ लाख विद्यार्थी पात्र होते. सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या आकाशने दोन वेळा एनडीएची परीक्षा पास केली होती. मात्र तांत्रिक बाबींच्या मुलाखतीत त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने जेईच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी त्याने युट्यूबवरील मोफत मार्गदर्शन करणाऱ्या जेईच्या परीक्षांविषयीच्या क्लासेसबद्दल माहिती करून घेतली. या मोफत जेईच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासेसवर त्याने परीक्षेचा अभ्यास केला.

रात्री अभ्यास दिवसा झोप -

या यशाबाबत आकाशने सांगितले की, मी गेले सहा महिने या परिक्षेसाठी रोज किमान दहा तास अभ्यास करीत होतो. किमान पास व्हावे, अशी माझी अपेक्षा होती. मात्र रँकिंग मिळाले आहे. त्यामुळे हे यश अपेक्षेच्या पलीकडील आहे. मी राहतो त्या परिसारत काही कंपन्या आहेत. दिवसभर त्यातून आवाज येतो. या आवाजाच्या त्रासामुळे मला नार्इलाजास्तव रात्रीच्या वेळी अभ्यास करावा लागत. त्यामुळे मी रात्री १० ते सकाळी आठपर्यंत अभ्यास करायचो. त्यानंतर घरातील कामे करून झोप घेत व संध्याकाळी सामान्य ज्ञानाचा अभ्यास करीत.

या यशात कुटुंबासह मी राहत असलेल्या सोसायटीचा देखील मोठा वाटा आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या विचारातूनच मला आजही पुन्हा सैन्य दलात जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग पूर्ण मी पुन्हा सैन्याच्या परिक्षेची तयारी करणार आहे.

- आकाश बनसोडे

Web Title: Got Selected In Iit Without Attending Any Classes Success Motivation Aakash Bansode

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..