

BEML Limited Hiring 100 Junior Executives Walk in Interview Bangalore 15 16 November
esakal
BEML Job Vacancy 2025 : भारत सरकारची प्रतिष्ठित कंपनी बीईएमएल लिमिटेडने इंजिनिअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी संधी जाहीर केली आहे. कंपनीने कनिष्ठ कार्यकारी (ज्युनियर एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी १०० रिक्त जागा भरायच्या आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी वॉक इन मुलाखती घेतल्या जाणार असून इच्छुक उमेदवार १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी थेट हजर राहू शकतात.