Government job : पदवीधरांसाठी डीआरडीओमध्ये सरकारी नोकरीची संधी

या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
Government job
Government jobgoogle

मुंबई : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने 1,901 पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. DRDO मध्ये भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तांत्रिक A च्या एकूण 1,901 पदे भरली जातील. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२२ आहे. (DRDO Recruitment 2022)

Government job
SAIL Recruitment 2022 : आयटीआय आणि पदविकाधारकांची शिकाऊ पदांवर भरती

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 1,901

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B- 1,075 पदे

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक A- 826 पदे

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 3 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

वय मर्यादा

अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Government job
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच १५,२४७ पदांवर भरती

शैक्षणिक पात्रता

या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

परीक्षेची योजना

या भरतीसाठी उमेदवारांना दोन स्तरांतून जावे लागते. टियर 1 स्क्रीनिंग टेस्ट आणि टियर 2 निवड चाचणी असेल.

पगार

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन दिले जाईल, तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक A पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 19, 900 ते 63, 200 रुपये दिले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com