Government Scholarships : तुम्हालाही परदेशात शिकायचंय? जाणून घ्या केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

Government Scholarships : तुम्हालाही परदेशात शिकायचंय? जाणून घ्या केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना

Government Scholarships For Study Abroad : प्रत्येकाला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र, परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे शिक्षणाचा खर्च होय.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

हेही वाचा: Government Scholarship : यापुढं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार नाही 'ही' स्कॉलरशिप; मोदी सरकारचा आणखी एक निर्णय

असे अनेक विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत, पण परदेशात जाण्यासाठी येणार खर्च परवडत नसल्याने अनेकांचं हे स्वप्न अधूरचं राहतं. मात्र, केंद्रकडून परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आज आपण परदेशात शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणकोणत्या शिष्यवृत्ती देते याबाबत जाणून घेणार आहोत.

भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. मंत्रालयाकडून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.education.gov.in ला भेट द्यावी लागते.

हेही वाचा: Prajjwala Challenge Scheme : मोदींकडून लखपती होण्याची संधी; जाणून घ्या योजना

गरीब लोकांसाठी शिष्यवृत्ती

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून अनेक शिष्यवृत्ती दिल्या जातात. यामध्ये नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेचाही समावेश आहे.

ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, विलुप्त होणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील लोकांना दिली जाते. ही शिष्यवृत्ती परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करण्यासाठी दिली जाते.

वरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थांना अधिकृत वेबसाइट www.nosmsje.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये, वैयक्तिक तपशील, अभ्यासक्रमाचे नाव आणि परदेशी विद्यापीठाचे नाव नमूद करावे लागेल.

याशिवाय पुराव्यासाठी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतील. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांना किमान ६० टक्के अधिक गुण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Toyota Data : टोयोटा कार खरेदीदारांचा पर्सनल डेटा इंटरनेटवर लीक

ST विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिष्यवृत्ती

एखादा विद्यार्थी अनुसूचित जमातीतून आला असेल तर त्याला परदेशात शिक्षण घेण्याचीही संधी आहे. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप योजना आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत चालवली जाते. यासाठी उमेदवारांना www.overseas.tribal.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो. ही शिष्यवृत्ती दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पीएचडी आणि पोस्ट-डॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी दिली जाते.

हेही वाचा: डिझाईन क्षेत्रातील करियरसाठी स्कॉलरशिप

पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप प्रोग्राम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान केली जाते. परदेशी संस्थांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणे हा या फेलोशिपचा उद्देश आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उमेदवार STEM विषयातील पूर्ण-वेळ पीएचडी पदवीशी संबंधित असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थी www.serbonline.in ला भेट देऊ शकतात.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी व्याज अनुदान योजना राबविली जाते. याअंतर्गत परदेशात शिक्षणासाठी घेतलेले कर्ज माफ करण्याची योजना आहे. या संदर्भात उमेदवारांना त्यांच्या बँक तपशील देणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार www.minorityaffairs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.