फसव्या जाहिराती करणाऱ्या शैक्षणिक कंपन्याना सरकारचा कडक इशारा, वाचा काय आहे प्रकरण

सरकारने जाहिरातींद्वारे दिशाभूल करणाऱ्या या एज्युटेक शैक्षणिक कंपन्यांना अनुचित व्यवसाय करण्यासंदर्भात कडक इशारा दिला.
online eduaction
online eduactionsakal

तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देणाऱ्या कंपन्यांना ‘एज्युटेक’ म्हणतात. सरकारने जाहिरातींद्वारे दिशाभूल करणाऱ्या या एज्युटेक शैक्षणिक कंपन्यांना अनुचित व्यवसाय करण्यासंदर्भात कडक इशारा दिला. सरकारने म्हटले आहे की या कंपन्यांनी स्वयं-नियमन न स्वीकारल्यास त्यांच्यावर कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणण्यास भाग पाडले जाईल.

online eduaction
धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकन सरकारचा अहवाल भारतानं फेटाळला

ग्राहक व्यवहारसंबंधी सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिल्लीत स्वयं-नियमक संस्था ‘इंडिया एजुटेक कंसोर्टियम (IEC) आणि इतर उद्योग क्षेत्रातील अन्य कंपन्यांसोबत बैठक घेतली. यादरम्यान एज्युटेक क्षेत्रातील खोट्या रिव्ह्यूजमध्ये होणारी वाढ आणि असे अनुचित प्रकार रोखण्याचे उपाय यावर चर्चा करण्यात आली. IEC, इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) च्या तत्वाखाली त्या काम करतात.

online eduaction
JOB UPDATES: ८वी आणि १०वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी

या बैठकीला IAMAI चे प्रतिनिधी तसेच IEC च्या सदस्यांसह Upgrade, Byju's, Unacademy, Vedantu, Great Learning, WhiteHat Junior आणि Sunstone या कंपन्यासुद्धा सहभाग घेतला होता.

स्वयं-नियमनाद्वारे अनुचित व्यवसाय आणि व्यापार पद्धतींना आळा घातला गेला नाही तर, पारदर्शकता तपासण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे,असे रोहीत सिंह बैठकीत म्हणाले.

online eduaction
अभियांत्रिकी शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु

या बैठकीतील अनुचित व्यापार व व्यवसाय पद्धती आणि भारतीय शिक्षण क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. अॅडवरटाइजिंग स्टैंडर्ड काउंसिल ऑफ इंडिया (ASCI) च्या अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की शैक्षणिक क्षेत्रातील सत्र 2021-22 मध्ये एज्युटेक कंपन्या जाहिरात संहितेचे उल्लंघन करण्यात आघाडीवर होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com