Jobs : एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांवर नोकरीची मोठी संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया
एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांवर नोकरीची मोठी संधी!

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांवर नोकरीची मोठी संधी!

सोलापूर : भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालयाने (Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (Recruitment) एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. अधिनियम 1961/2014 अंतर्गत विविध विभागांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 90 पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट @aai.aero वर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

हेही वाचा: डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण रिक्त पदांपैकी 25 पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी पदे आणि पदविका शिकाऊ उमेदवारांच्या 38 पदांची भरती केली जाईल. दुसरीकडे, या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवीधर असणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी, डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असावा. याशिवाय, इतर पदांच्या पात्रतेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर असलेली अधिसूचना तपासावी.

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की त्यांनी अर्जाचा फॉर्म नीट वाचावा, कारण फॉर्ममध्ये कोणतीही माहिती अपूर्ण राहिल्यास किंवा ती चुकीची आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

loading image
go to top