Admission
AdmissionSakal

पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद

इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि पॉलीटेक्निक डिप्लोमा या अभ्यासक्रमाची 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिये च्या सुरुवातीच्या नोंदणी प्रक्रियेला 30 जून पासून सुरुवात झाली.

मुंबई - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (Engineering Diploma) आणि पॉलीटेक्निक डिप्लोमा (Polytechnic Diploma) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेसाठी (Admission Process) मागील दोन दिवसात तब्बल 6 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी (Student Registration) केली असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. (Great Response to Polytechnic and Engineering Diploma Enrollment)

इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि पॉलीटेक्निक डिप्लोमा या अभ्यासक्रमाची 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिये च्या सुरुवातीच्या नोंदणी प्रक्रियेला 30 जून पासून सुरुवात झाली आहेत. त्यासाठी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पॉलीटेक्निक डिप्लोमा आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची छायाप्रती प्रती अपलोड करणे त्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची मुदत 23 जुलै पर्यंत तर तात्पुरती गुणवत्ता यादी 26 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी ही नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर कागदपत्र तपासणी साठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत यामध्ये ई-स्क्रूटनी सर्व सुविधा केंद्रात येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.

Admission
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वोत्कृष्ट स्कॉलरशीप्स; जाणून घ्या सर्वकाही...

तात्पुरती गुणवत्ता यादी - 26 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून गुणवत्ता यादी वरील आक्षेप विद्यार्थ्यांना 27 ते 29 जुलै दरम्यान नोंदवता येणार आहेत. तर अंतिम गुणवत्ता यादी - 31 जुलै रोजी जाहीर केली जाणार असल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात आले.

पॉलीटेक्निक डिप्लोमा आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून 8698742360, 8698781669 या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. तर या नोंदणी आणि. प्रवेशाची. अधिकची माहिती http://poly21.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com