esakal | तीन IAS बहिणींचा सेम प्रवास; भूषवलं एकाच राज्याचं मुख्य सचिव पद
sakal

बोलून बातमी शोधा

IAS Sisters

तिघी बहिणी युपीएससी पास झाल्या आणि IAS झाल्यावर एकाच राज्याचं मुख्य सचिव पदही भूषवण्याची संधी तिघींना मिळाली.

तीन IAS बहिणींचा सेम प्रवास; भूषवलं एकाच राज्याचं मुख्य सचिव पद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदिगड - मोठ्या भावंडाच्या पावलावर लहान भावंडं पाऊल टाकतात. पण ते आयुष्यात पुढच्या वाटचालीतही सेम तसंच करण्याची शक्यता कमी असते. मात्र असा एक प्रकार योगायोगाने तीन बहिणींबाबत घडला आहे. तिघी बहिणी युपीएससी पास झाल्या आणि IAS झाल्यावर एकाच राज्याचं मुख्य सचिव पदही भूषवण्याची संधी तिघींना मिळाली. केशानी, मिनाक्षी आणि उर्वशी अशी त्या बहिणींची नावे. त्या फक्त आयएएस झाल्या नाहीत तर हरियाणाच्या मुख्य सचिवही बनल्या. 

पंजाब युनिव्हर्सिटीतून प्रोफेसर म्हणून निवृत्त झालेल्या जेसी आनंद यांच्या तीन मुली केशानी, मिनाक्षी आणि उर्वशी यांच्याबाबत हा अनोखा योगायोग घडला आहे. सध्या केशानी आनंद अरोडा या हरियाणाच्या मुख्य सचिव आहेत. जेसी आनंद यांच्या तीनही मुलींनी या खुर्चीत बसण्याची संधी मिळाली. केशानी यांच्या आधी मिनाक्षी, उर्वशी यांनी मुख्य सचिव पद सांभाळलं आहे. 

हे वाचा - एक हजार वर्षांचा इतिहास असलेलं ऑक्सफर्ड; जगातल्या दिग्गजांनी घेतलंय शिक्षण

तीन बहिणींपैकी मिनाक्षी चौधरी यांनी पहिल्यांदा हरियाणाच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्यानंतर उर्वशी आणि केशानी यांसुद्धा मुख्य सचिव झाल्या होत्या. मिनाक्षी यांनी 8 नोव्हेंबर 2005 ते 30 एप्रिल 2006 या काळात राज्याच्या मुख्य सचिव होत्या. मिनाक्षी या 1969 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. 

मिनाक्षी यांच्यानंतर उर्वशी गुलाटी या मुख्य सचिव पदी विराजमान झाल्या होत्या. 1975 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी असलेल्या उर्वशी यांनी 31 ऑक्टोंबर 2009 ला हरियाणाच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर 31 मार्च 2012 पर्यंत त्या मुख्य सचिव पदी कार्यरत होत्या. 

हे वाचा - पहिल्याच प्रयत्नात IPS झाल्यानंतरही पुन्हा परीक्षा देऊन बनली IAS

मिनाक्षी आणि उर्वशी यांच्यानंतर केशानी यांची हरियाणाच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली. केशानी या 1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. हरियाणाच्या त्या 33 व्या मुख्य सचिव असून पाचव्या महिला आहेत. केशानी 30 सप्टेंबपर्यंत या पदावर कार्यरत राहतील. केशानी यांचा जन्म 20 सप्टेंबर 1960 ला पंजाबमध्ये झाला. राज्यशास्त्रातून एमए एमफील केलेल्या केशानी त्यांच्या बॅचच्या टॉपर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियात सिडनीतून एमबीए पूर्ण केलं. हरियाणा राज्य निर्माण झाल्यानंतर 16 एप्रिल 1990 ला त्या पहिल्या महिला उपायुक्तसुद्धा झाल्या होत्या.