पुढील ६ महिन्यात निघणार २० हजार जागांसाठी भरती; वाचा सविस्तर

टीम ई-सकाळ
Wednesday, 20 January 2021

एचसीएल टेक्नॉलॉजीजने श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांत सुविधा पुरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूक वाढवली आहे.

नवी दिल्ली : आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL technologies) पुढील सहा महिन्यांत जवळपास २० हजार जागांसाठी भरती करण्याच्या तयारीत आहे. डील साइनिंग आणि डिजिटल सेवांची मागणी वाढत असल्यामुळे कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. नोएडा स्थित कंपनीमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १,५९,६८२ कर्मचारी कार्यरत होते तसेच या कॅलेंडर वर्षात कंपनीने १० अब्ज डॉलरचा व्यवसाय केला होता. 

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ सी. विजयकुमार म्हणाले की, क्यू-3 अर्थात तिसऱ्या तिमाहीमध्ये ६५०० पेक्षा जास्त लोकांनी नेट हायरिंग केली होती. यासाठी आम्हाला आणखी कामगारांची गरज असून फ्रेशर्स आणि अनुभवी लोकांच्या शोधात आहोत. 

इंजिनिअर्स तरुण-तरुणींनींना SBIमध्ये नोकरीची संधी; कोणतीही लेखी परीक्षा नाही​

व्हिसाशी संबंधित समस्यांबाबत ते म्हणाले, एचसीएल सारख्या अन्य कंपन्या व्हिसावर अवलंबून न राहता स्थानिकांकडे मोर्चा वळवला आहे. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये जवळपास ६९.८ टक्के कर्मचारी हे स्थानिक आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरवात केली आहे. गेल्या तिमाहीत ७० टक्क्यांपर्यंत स्थानिकांना नोकऱ्या दिल्या आहेत. आधी हे प्रमाण ६७ टक्के एवढं होतं.

MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​

एचसीएल टेक्नॉलॉजीजने श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांत सुविधा पुरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूक वाढवली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एचसीएलने श्रीलंकेत काम सुरू केलं आहे. त्यामुळे पुढील दीड वर्षात १५०० पेक्षा अधिक स्थानिकांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर तिमाहीत (२०२०-२०२१) कंपनीच्या नफ्यात ३१ टक्के अशी भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या तिजोरीत ३९८२ कोटी रुपये जमा झाले आहेत. 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HCL technologies will recruit 20 thousand employees in next 6 months