Viral Entrepreneur Post: मुंबईत राहणाऱ्या साक्षी जैन या उद्योजिकेने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली असून, ती सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने स्वतःचा अनुभव मांडला आहे. ज्यामुळे अनेकांचे विचार बदलू लागले आहेत..मुंबईतील उद्योजिका साक्षी जैन यांची एक लिंक्डइन पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने एक अनुभव शेअर केला असून, तो अनुभव त्यांच्या करिअर, यश, डिग्री आणि मेहनतीबद्दलच्या विचारांना बदल घडवणारा ठरला आहे..JEE Advanced 2025 Registration: जेईई अॅडव्हान्स्ड 2025 साठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अर्ज कसा करावा आणि वेळापत्रक.साक्षी जैनने सांगितलं की ती नुकतीच तिच्या एका मैत्रिणीला भेटली. ही मैत्रीण IIM कोलकातामधून MBA करत आहे आणि सध्या मुंबईत एका इंटर्नशिपसाठी दरमहा ₹3.5 लाख स्टायपेंड मिळवत आहे."हो, फक्त इंटर्नशिपसाठीच!" असं साक्षीने आश्चर्य व्यक्त करत सांगितलं.ती म्हणाली की, ही पोस्ट कुणाशी तुलना करण्यासाठी नव्हती. पण हा अनुभव शेअर करताना तिला असं वाटलं की डिग्रीबाबत आपल्या समजुती कधी कधी बदलायला हव्यात.."आपण सोशल मीडियावर अनेकदा म्हणतो की डिग्रीची गरज नाही. मलाही तसं वाटायचं. पण कधी कधी काही प्रसंग आपल्याला विचार करायला लावतात," असं साक्षीने लिहिलं."डिग्री सगळीकडे उपयोगी पडत नाही, हे खरं आहे. पण काही वेळा ती अशी दारं उघडते, जी आधी दिसतच नाहीत. अजूनही काही क्षेत्रांमध्ये डिग्रीला महत्त्व आहे."साक्षीची ही पोस्ट LinkedIn आणि X (पूर्वीचं Twitter) वर खूप व्हायरल झाली आहे. अनेक लोकांनी आपल्या अनुभवांसह सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत..PM Modi Favorite Food: पंतप्रधान मोदींना आवडतं शेवग्याचे सूप, तज्ज्ञ सांगतात भारतीयांसाठी टॉप 3 सुपरफूड्स.एका युझरने लिहिलं,“डिग्री सगळं काही नसते, पण त्या काही वेळा अशा दरवाज्यांची चावी असतात, जे आधी दिसतच नाहीत.”तर दुसऱ्याने लिहिलं,"यश मिळवण्यासाठी एकच मार्ग नसतो. डिग्री असेल तर काही दरवाजे उघडतात, पण स्वतःचे गुण वापरले तर अजून चांगलं."आणखी एका व्यक्तीने लिहिलं,"प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने यश मिळवतो. कोणता मार्ग घ्यायचा, हे तुमच्यावर आहे." असा विचार व्यक्त करण्यात आला..पोस्टच्या शेवटी साक्षी म्हणाली की, “ही पोस्ट कोणाशी तुलना करण्यासाठी नाही. फक्त एक छोटीशी आठवण जिंकण्याचे अनेक मार्ग आहेत. आणि प्रत्येक मार्ग योग्यच आहे.”या पोस्टवर हजारो लोकांनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सगळेच लोक ही पोस्ट आपल्या अनुभवांनुसार वेगवेगळ्या प्रकारे पाहत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.