esakal | Jobs: जूनमध्ये मनुष्यबळाच्या मागणीत मध्ये 15 टक्क्यांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

Jobs: जूनमध्ये मनुष्यबळाच्या मागणीमध्ये 15 टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: कोरोनाकाळात देशात मोठी बेरोजगारी निर्माण झाली होती. याकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. लॉकडाउनमुळे संपूर्ण चक्र बंद पडल्याने अनेक कंपन्या बंद पडल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील परिस्थिती काही प्रमाणात मार्गावर येताना दिसत आहे. या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकऱ्या वाढलेल्या (hiring actvity वाढली) दिसत आहे. Naukri JobSpeak च्या नव्या अहवालानुसार, भारतात जून महिन्यात 15 टक्क्यांची वाढ दिसली आहे.

रिपोर्टनुसार देशातील मनुष्यबळाची वाढती मागणी पाहता हे औद्योगिक रिकव्हरीचे संकेत असल्याचे दिसत आहेत. एप्रिल महिन्यात घट झाल्यानंतर आता जूनमधील रिपोर्ट दिलासा देणारा आहे. त्यामुळे हायंरिग ऍक्टिव्हिटी (hiring actvity) वाढताना दिसत आहे. Naukri JobSpeak हे एक मासिक इंडेक्स असून ते Naukri.com या वेबसाईटवर जॉब लिस्टींगच्या आधारे hiring actvity ची गणना करते. या काळात सेवा क्षेत्रातील आयटीमध्ये संकटांवर मात करण्यासाठी मॅनपावर वाढवलेले दिसते. आयटी-सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात मागील महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाकाळानंतर या क्षेत्रात मोठी वाढ दिसत आहे.

हेही वाचा: 'प्रामाणिकपणाने भावाला उंचीवर नेले'; डॉ. कराडांच्या भगिनीचे मनोगत

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये हॉटेल, हवाई सेवा, किरकोळ विक्री, पर्यटन या क्षेत्रात सुधारणा दिसली आहे. तसेच विमा क्षेत्रातही 38 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बँकींग आणि वित्तीय सेवामध्ये (29 टक्के), फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक (22 टक्के) सुधारणा दिसली आहे. एफएमसीजी (22 टक्के), शिक्षण (15 टक्के), बीपीओ/आईटीईएस (14 टक्के) या क्षेत्रातही वाढ झाल्याने मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण झाले आहे. पुण्यात नोकरीच्या कामात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर हैदराबाद (१० टक्के) आणि बंगलोर (per टक्के) आहे.

loading image