
सोशल मीडियावर सध्या एक नोकरीची जाहिरात जोरदार चर्चेत आलीय. चर्चेत येण्याचं कारणही तितकंच खास आहे. नोकरी हाउस मॅनेजरची असून त्यासाठी थोडा थोडका नव्हे तर तब्बल ८४ लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासाठी घरकाम येणं गरजेचं आहे. हाउस मॅनेजरच्या नोकरीसाठी निवड झाल्यास वर्षाला ८४ लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे.