संवाद साधण्यासाठीचा आत्मविश्वास

जगभरातील लोक ज्या एका भीतीवर मात करू इच्छितात ती पहिल्या क्रमांकावर असलेली भीती म्हणजे, आत्मविश्वासाने संवाद साधणे! खरं तर, संशोधनानुसार असे समोर आले आहे की, जगातील ९३ टक्के लोकसंख्येला इतरांशी बोलण्यात अस्वस्थता जाणवते.
How to Be More Confident When Communicating
How to Be More Confident When Communicating Sakal

- प्रांजल गुंदेशा

जगभरातील लोक ज्या एका भीतीवर मात करू इच्छितात ती पहिल्या क्रमांकावर असलेली भीती म्हणजे, आत्मविश्वासाने संवाद साधणे! खरं तर, संशोधनानुसार असे समोर आले आहे की, जगातील ९३ टक्के लोकसंख्येला इतरांशी बोलण्यात अस्वस्थता जाणवते.

ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. ८६ टक्के लोक त्यांचा आत्मविश्वास किंवा आत्मविश्वासाची कमतरता याला त्यांना आलेल्या अनुभवांशी जोडतात. त्यामुळे आधी बोलता आले नाही, म्हणून यापुढेही येणार नाही, असा त्यांचा दृढ समज होतो.

मात्र सत्य हे आहे की, की संवादावरील आत्मविश्वास हे सहजपणे मिळवता येणारे कौशल्य आहे. संवादातील आत्मविश्वासामध्ये प्रामुख्याने पुढील चार पैलूंचा समावेश होतो. १) चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि देहबोली २) आवाजातील आत्मविश्वास ३) भाषेचा आत्मविश्वास ४) मानसिक आत्मविश्वास. आता या प्रत्येक पैलूचा सविस्तरपणे विचार करूया.

आत्मविश्‍वासपूर्ण देहबोली

  •  मिरर टॉक : आरशासमोर उभे राहून स्वतःशी बोलण्याचा सराव करा. यामुळे तुम्हाला तुमची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण करण्यात आणि त्यात सुधारण करण्यात मदत होईल.

  •  पात्रांमधील संवाद : एखादी काल्पनिक परिस्थिती तयार करून त्यातील पात्रे कशी संवाद साधतील? याची कल्पना करून त्या प्रकारे संवाद साधा. यामुळे विविध प्रसंगांवेळी आपण कसे बोलावे? याचा आत्मविश्‍वास निर्माण होईल.

आवाजातील आत्मविश्वास

  •  रेकॉर्ड करा आणि ऐका : स्वतःचे बोलणे रेकॉर्ड करण्याची सवय लावा. त्यानंतर तुम्ही जे रेकॉर्ड केलं, ते शांतपणे ऐका. त्यामध्ये कुठे, कोणत्या प्रकारची सुधारणा करणे आवश्‍यक आहे, ते ओळखा आणि त्यानुसार बदल करा. यामुळे तुम्ही स्वतःच स्वतःचे मूल्यांकन करू शकता. त्यामुळे आपला संवाद साधण्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

  •  पातळी आणि चढ-उतार : तुम्हाला जे बोलायचे आहे त्याच्या आशयानुसार तुमच्या आवाजाची पट्टी खाली-वर करणे आणि बोलताना योग्य तिथे चढ-उतार घेणे यामुळे तुमचा आवाज ऐकताना कंटाळा येणार नाही. आवाजात चढ-उतार आणून भाषण, कथा सांगण्याचा सराव करा.

  •  शब्दांवरील आघात : बोलता बोलता ज्यावर आपण आघात देऊ शकतो, असे शब्द ओळखा आणि त्यावर आघात द्या. त्यामुळे बोलण्याचा प्रभाव पडतो आणि समोरच्याचे लक्ष वेधले जाते.

भाषेचा आत्मविश्वास :

  •  शब्दसंग्रह : तुमचा स्वतःचा शब्दसंग्रह म्हणजेच ‘वर्ड बँक’ तयार करा. त्यासाठी वेळ काढा. पुस्तक वाचताना, भाषणे किंवा मुलाखती ऐकताना नवीन शब्द नोंदवून ठेवा आणि नंतर त्याचा हेतुपुरस्सर वापर करा. सराव म्हणून त्यातून नवनवीन वाक्ये तयार करा.

  •  विविध शिष्टाचार : फोनवर कसे बोलावे हे जाणीवपूर्वक शिकून घ्या. संभाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी वापरली जाणारी वाक्ये जाणून घ्या आणि त्यांचा वापर करा. असे विविध प्रकारचे सामाजिक शिष्टाचार तुम्हाला शिकून घेता येतील. त्यामुळे तुमचा बोलण्याचा आत्मविश्‍वास वाढेल.

  •  व्यक्त व्हा : स्टोरी बिल्डिंगसारखे खेळ खेळा, अनुभवांची देवाण-घेवाण करा. यामुळे तुम्हाला व्यक्त होण्याची सवय लागेल.

  •  नोंदवून ठेवा : तुमचे विचार, भावना आणि अनुभव नोंदवून ठेवण्याची सवय लावा. यामुळे आपल्याला अंतर्मुख होण्याची आणि शांतपणे विचार करण्याची सवय लागते.

मानसिक आत्मविश्वास

  •  दृश्‍यरूप डोळ्यांसमोर आणा : सार्वजनिक स्तरावर बोलण्यापूर्वी किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण संभाषणादरम्यान आपण आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे बोलत असल्याचे चित्र डोळ्यांसमोर आणा. सकारात्मक दृश्‍ये पाहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो, कामगिरी सुधारते.

  •  चुका स्वीकारा : चुका होण्याच्या भीतीने आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. चुकांचा स्वीकार करा आणि शिकण्याच्या संधी म्हणून त्यांचा वापर करा.

  •  सकारात्मक विचार : ‘मी आत्मविश्वासाने संवाद साधणार आहे’, ‘मी स्पष्टपणे आणि ठापमणे बोलतो आहे’ यांसारखी वाक्ये स्वतःच्या मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत राहा. यामुळे तुमच्यातले सकारात्मक विचार कार्यरत होतील.

  • लक्षात ठेवा, ज्ञान + अनुभव = सक्षमीकरण. संवादावर प्रभुत्व मिळवण्याचा मार्ग तुमच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडल्यावरच तुम्हाला दिसेल.

    (संवादाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम आणि ‘द इंटेलिजन्स प्लस’ या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com