ऑटेमेशनमुळे करिअरमध्ये कसे होतील बदल? जाणून घ्या वेबिनारमधून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Engineer Automation

ऑटेमेशनमुळे करिअरमध्ये कसे होतील बदल? जाणून घ्या वेबिनारमधून

अमृता विद्यापीठाकडून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. २८ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ८ वेबिनार होणार आहेत. अमृता विश्व विद्यापीठ, यंग इन्सिपरेटर्स नेटवर्क सकाळ प्रस्तुत 'Career Beyond CSE (Computer Science Engineering) for Engineering Aspirants या विषयावर हे वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

उद्या या वेबिनार्समधील पुढचा वेबिनार होणार आहे. उद्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या वेबिनारमध्ये 'हाऊ विल ऑटोमेशन चेंज द करिअर लँडस्केप' या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी 3 वाजता हे वेबिनार होणार असून यासाठी तुम्ही देखील नावनोंदणी करु शकता.

नोंदणीसाठीची लिंक:

https://docs.google.com/forms/d/19GlxPJ9tXyqsYTU7yxzYo2ye37Xf4DXib1Pn4Yt17T8/edit

यातील पहिल्या वेबिनारमध्ये अमृता विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक आणि डायरेक्टर ब्र. महेश्वर चैतन्य तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर दिनेश कुडाचे यांचे मार्गदर्शन झाले होते. तसेच इथून पुढच्या वेबिनारमधून देखील वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. सध्या अनेक विद्यार्थ्यांशी वेबीनारच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. यामध्ये डेटा सायन्स, डेटा इंजिनियरिंग, artificial intelligence या सारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन होत आहे.

हेही वाचा: ST संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल: हायकोर्ट

यामधील दुसरा वेबिनार हा 15 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. "विल रोबोट्स रुल द मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री?" असा या वेबिनारचा विषय होता. या वेबिनार मध्ये प्राध्यापक डॉ के एल वासुदेव तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर आतिश पतंगे हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी आतिश पतंगे यांनी म्हटलं होतं की, आत्ता जरी नसेल तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोबोटिक्स भारतामध्ये येणार आहे. डॉ के एल वासुदेव यांनी म्हटलं होतं की, रोबोटिक्स हे सगळ्या जगात वाढत आहे. हल्ली सगळ्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये दिसायला लागल्या आहेत. फूड, गाड्या, अश्या अनेक क्षेत्रात रोबोटिक्स दिसू लागले आहे. करिअर ची देखील एक चांगली संधी या क्षेत्रात आहे.

loading image
go to top