HSC Exam : बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) येत्या सोमवारपासून (ता.२२) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
HSC exam
HSC examsakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) येत्या सोमवारपासून (ता.२२) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी सूचना राज्य मंडळाने दिली आहे. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com