esakal | राज्यात होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय घट
sakal

बोलून बातमी शोधा

In Pune 7 people including 4 seniors defeated Corona virus and return home

राज्यात होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) नव्या कोरोना (corona) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती एक लाखांच्या खाली आहे. राज्यात दररोज 6 ते 7 हजार दरम्यान कोरोना (corona) रुग्ण आढळत आहेत. याचाच सकारात्मक परिणाम राज्यातील होम क्वारंटाईन (Home Quarantine) असणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवर झाला आहे. (Decline Significant number of home quarantine persons maharashtra)

राज्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीमध्ये सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या आणि होम क्वारंटाईन असणाऱ्यांमध्ये ही वाढ झाली होती. मात्र, आता गेल्या एका महिन्यात राज्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 5 लाखांवर पोहोचली असून जवळपास निम्म्याहून अधिक ही घट दिसते.

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 354 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 977 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आजवर तब्बल साडेचार कोटींहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच दररोज होणा-या चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे,  सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती एक लाखांच्याही खाली आली आहे.

हेही वाचा: पेगॅसस प्रकरणाची SCच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी - काँग्रेस

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार,  राज्यात 1 जून या दिवशी 17 लाख 68 हजार 119 व्यक्ती होम क्वारंटाईन होते. मात्र, ही संख्या 11 लाख 52 हजार 906 ने घटून 1 जुलै या दिवशी 6 लाख 15 हजार 285 वर पोहोचली. पण, आता संख्येत अजून घट होऊन 20 जुलैपर्यंत फक्त 5 लाख 60 हजार 354 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 3 हजार 977 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा: राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही - राजेश टोपे

एका महिन्याची आकडेवारी -

1 जून - 17 लाख 68 हजार 119

15 जून - 9 लाख 04 हजार 462

28 जून - 6 लाख 15 हजार 839

1 जुलै - 6 लाख 15 हजार 285

20 जुलै - 5 लाख 60 हजार 354

मुंबईत फक्त 76 हजार होम क्वारंटाईन-

मुंबईत (mumbai) सद्यस्थितीत फक्त 76 हजार 684 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, गेल्या महिन्यात 1 जून या दिवशी 2 लाख 82 हजार 637 जण होम क्वारंटाईनमध्ये होते. त्यात कमालीची घट झाल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या (mumbai corporation) डॅशबोर्डवरुन स्पष्ट होत आहे. 829 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. तर, आतापर्यंत 74 लाख 48 हजार 575 लोकांनी होम क्वारंटाईन पूर्ण केले आहे. दरम्यान, सक्रिय रुग्णांच्या संख्येत ही घट झाली असून मुंबईत 6161 एवढे सक्रिय रुग्ण आहेत आणि राज्यात 94 हजार 593 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image