esakal | आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS 
sakal

बोलून बातमी शोधा

tina dabi

भारतात सर्वात पहिला हॉटस्पॉट ठरलेल्या भीलवाडा इथं कोरोनाला रोखण्यात यश मिळवल्यानंतर आयएएस अधिकारी टीना डाबी चर्चेत आली होती. पुन्हा एकदा टीना डाबीचे नाव चर्चेत आलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - भारतात सर्वात पहिला हॉटस्पॉट ठरलेल्या भीलवाडा इथं कोरोनाला रोखण्यात यश मिळवल्यानंतर आयएएस अधिकारी टीना डाबी चर्चेत आली होती. भीलवाडा पॅटर्नची चर्चाही देशभरात झाली. पुन्हा एकदा टीना डाबीचे नाव चर्चेत आलं आहे. तिची निवड आंतरराष्ट्रीय संस्था ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सल्लागारपदी निवड जाली आहे. या पदावर नियुक्त होणारी ती भारताची पहिली आयएएस अधिकारी ठरली आहे. टीना डाबीला यंग लीडर्स कार्यक्रम 2020-2023 साठी इंडियन चॅप्टरची तीन वर्षांसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केली आहे. 

यूथ लीडरशिप कार्यक्रमांतर्गत दरवर्षी होणाऱ्या यूथ लीडरशिप, नेशन बिल्डिंग अँड थॉट लीडरशिप, व्यवसायाच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट याबाबत सल्ला आणि मार्गदर्शनाचे काम करणार आहे. सध्या टीना डाबी भीलवाडा इथं एसडीएम आहे. तिच्या रणनिती आणि कठोर निर्णयाच्या आधारावरच भीलवाडा इथं कोरोना व्हायरसला रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राजस्थानात हॉटस्पॉट म्हणून भीलवाडाचा समावेश होता. त्यानंतर दररोजच्या बैठका, फीडबॅक आणि त्यानंतर प्लॅनिंग करत प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. याकाळात झोकून देत काम करत नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडेही प्रशासनाने लक्ष दिले होते. 

हे वाचा - कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?

टीना डाबी तिच्या बॅचची देशात टॉपर होती. बारावी पास झाल्यानंतरच आयएएस व्हायचं आहे असा निश्चय तिने केला होता. टीना डाबी म्हणाली होती की, अभ्यास करताना अनेकदा कंटाळा यायचा तेव्हा घरचे लोक मला इतर गोष्टी करायला लावायचे. क्लासेसशिवाय मित्रांसोबत अभ्यास केला आणि परीक्षेची तयारी केली. तेव्हा पास होऊ याची खात्री होती पण टॉप येईल असं वाटलं नव्हतं.

दिल्ली युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्रात ती अव्वल आली होती. याशिवाय 12 वी मध्ये राज्यशास्त्र आणि इतिहासात तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले होते. भारताच्या राजकारणाची विशेष आवड आहे. संसदीय प्रक्रिया आणि भारतीय संविधान हासुद्धा तिच्या अभ्यासाचा विषय आहे. 

हे वाचा - तब्बल 30 वेळा अपयश आलं पण खचला नाही, IPS अधिकाऱ्याची संघर्षगाथा

आयएएस झाल्यानंतर टीना हरियाणाच्या कॅडरमध्ये होती. तिचे वडील जसवंद डाबी हेसुद्धा युपीएससी पास झालेले आहेत. टॉपर असलेल्या टीनाचे लग्नही चर्चेचा विषय होते. तिने काश्मीरचा अतहर आमिर खान या युपीएससी टॉपरशी लग्न केलं होतं. मुस्लिम धर्मीयाशी लग्न केल्यानं तिला टीकेचा सामना करावा लागला होता.