
IBM-SAP Layoffs : कर्मचारी कपात सुरूच! आता IBM अन् SAP कडून मोठ्या कपातीची घोषणा
IBM-SAP Layoffs : जगभारत आगामी काळात मोठ्या आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंदीच्या भीतीने अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. यात आता आणखी दोन दिग्गज कंपन्यांचा समावेश झाला आहे.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
त्यानंतर आता कर्मचारी कपातीच्या रांगेत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी IBM कॉर्पचाही समावेश झाला असून, बुधवारी कंपनीने 3,900 कर्मचारी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.
चौथ्या तिमाहीत महसूल आणि वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठता न आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने नमुद केले आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर IBM चे शेअर्स 2% ने घसरले आहेत.
SAP कडूनही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा
IBM शिवाय जर्मन सॉफ्टवेअर फर्म SAP ने गुरुवारी एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३००० कर्मचारी किंवा २.५ टक्के कर्मचारी कमी करणार असल्याचे सांगितले आहे.
जर्मनीमध्ये SAP चे मुख्यालय असून, SAP ने चौथ्या तिमाहीत क्लाउड बिझनेसच्या महसुलात 30 टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर ही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याशिवाय SAP ने Qualtrics मधील आपला हिस्सा विकण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे.
जगभरातील मंदीच्या भीतीने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय अनेक स्टार्टअप्सनी खर्चात कपात आणि नफा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.